Friday, April 26, 2024

/

येरे माझ्या मागल्या..ताक कन्या चांगल्या -येळ्ळूरच्या मंचावर पुन्हा हेकेखोरीचं दर्शन

 belgaum

सीमा सत्याग्रहींच्या सत्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीचे सर्व नेते येळ्ळूर येथे एकाच व्यासपीठावर दिसले खरे मात्र हा आनंद काही क्षणा पुरताच होता. या व्यासपीठावर पुन्हा हेकेखोरीच्या वल्गना झाल्यामुळे सारे नेते एका व्यासपीठावर आले तरी ठोस फायदा होण्याची धूसर शक्यता दिसली आहे.
आगामी विधान सभेच्या उमेदवारी वरून शहर समिती अध्यक्ष किरण ठाकूर यांनी मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी व माजी आमदार मनोहर किणेकर यांना दिलेला एकीचा प्रस्ताव त्या दोघांनी ठोकरला असल्याचे चित्रच त्यांनी केलेल्या भाषणातून समोर आले आहे.

येळ्ळूर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी कसरत करत दोन्ही गटातील नेत्यांना एकाच व्यासपीठावर बसवण्यात यश मिळवलं सकाळी 11 वाजता सुरू होणारा कार्यक्रम तब्बल दोन तास उशीरा सुरू झाला.शहर समिती अध्यक्ष किरण ठाकूर सकाळी अकरा वाजताच कार्यक्रम स्थळी दाखल झाले होते मात्र समितीचा दुसरा गट येण्यास उशीर झाला त्यांमुळे बारा ऐवजी एक वाजता हा नियोजित  वेळेपेक्षा कार्यक्रम दोन तास उशीर सुरू झाला.

 belgaum

चेहरा बदल करा नवीन चेहरे द्या मीच म्हणत असतील तर सरळ महिलांना उमेदवारी ध्या असं बजाववल्यावर हेकेखोर नेत्याने आपल्या भाषणात मी पुन्हा बसणारच असा हट्ट धरला. आपण कुठल्याही नेत्याचं ऐकणार नाही, जनतेचं ऐकणार असे जाहीर केले, यामुळे या कार्यक्रमाचे पावित्र्यच बदलून गेले.
सीमासत्याग्रहींच्या उपस्थितीत एकीने निवडणूक लढवण्याची शपथ घ्यायची गरज होती, पण तसे न करता प्रत्येकवेळी स्वतःचाच स्वार्थ पुढे करणाऱ्या या हेकेखोर नेत्याने किमान सीमा सत्याग्रहींचे तरी भान बाळगायला हवे होते, अशी चर्चा ग्रामीण भागात आहे.

125 जणांच्या कमिटीने मला उमेदवारी दिली होती आताही उमेदवारी मिळाली तर माघार नाही असे म्हणत हेकेखोर नेत्याने रणशिंगच फुंकले आहे.दोन्ही गट एक करून नवीन युवक असलेली कमिटी बनवून सर्व समावेशक भूमिका घेण्याची गरज असताना झालो तर मी, नाही तर कुणीच नाही, असा हेका त्या ग्रामीण भागातल्या नेत्याने भाषणात लावल्याने, तालुक्यात ये रे माझ्या मागल्या स्थिती होईल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.एकी करू पाहणाऱ्या दबाव गटाने अधिक काम करावं लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.