बेळगावचे नवे गुन्हा विभाग डीसीपी किंवा पोलीस उपायुक्त पदी महालिंग नंदगावी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावर काम करत असलेले अमरनाथ रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे.
नंदगावी हे केएसपीएस असून सध्या गुलबर्गा येथे डिसीआरई चे एस पी पदी होते. त्यांना बेळगावला नेमण्यात आले. अमरनाथ रेड्डी यांना पूर्वी एसीबी चे एस पी केले जाणार होते पण सध्या त्यांच्या बद्दलचा निर्णय राखीव आहे.