*आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाजाचा कल्याण पोलिसांनी केला पर्दाफाश, शक्यता बेळगाव कनेक्टिव्हिटी ची*

0
 belgaum

कल्याण शहराच्या पश्चिमेतील खडकपाडा पोलिस व कल्याण गुन्हे शाखा यांनी संयुक्त कारवाई करीत गांधारी परिसरातील महावीर व्हॅली या उच्चभ्र इमारतीमध्ये छापा टाकून तीन जणांना अटक केली आहे. या तिघांचाही संबंध बेळगाव परिसरातील सट्टेबाजांशी असल्याचा संशय व्यक्त झाला आहे, पुढील तपास सुरू असून स्पष्ट माहिती हाती आली नाही.
हे तीन जण आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टा चालवित होते. या ठिकाणी ऑनलाईनद्वारे क्रिकेटवर सट्टा सुरु होता. काल इंडिया श्रीलंका हा टी-20 क्रिकेट सामना सुरु असताना पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा हे तिघेही क्रिकेट सट्टय़ात गुंतले होते.
या तिघांची नावे हिरामल तलरेजा, व भाऊ मुकेश तलरेजा आणि मुलगा अनिल हिरामल तलरेजा अशी आहेत. हे तिघेही उल्हासनगरातील राहणारे आहेत. त्यांचा म्होरक्या दुबईत बसला आहे. एका विशेष वेबसाईटचा वापर करुन हा सट्टाबाजार सुरु होता. पोलिसांनी अटक आरोपींकडून एक लाखाची रोकड, काही लॅपटॉप,महागडे मोबाईल असा तीन लाख 29 हजारचा ऐवज जप्त केला आहे. उल्हासनगर हा क्रिकेट सट्टेबाजांचा अड्डा असून त्यांनी आत्ता कल्याणच्या उच्चभ्र वस्तीतून हा सट्टा सुरु केला आहे. इतक्या माेठया उंची इमारतीत सट्टेबाजांना काेणी घर दिले हाेते. त्यांनी ते भाड्याने घेतले की, त्यांचे स्वतःचे हाेते. याचा पाेलिस तपास करीत आहेत. साेसायटीत सट्टा चालतो याची कल्पना साेसायटीमध्ये राहणाऱ्यांना अजिबात नव्हती. पाेलिसांना आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून बातमी मिळाली हाेती. पाेलिसांची खबर पक्की ठरली. त्यांनी महावीर व्हॅलीत छापा टाकला तेव्हा तिघे आराेपी पाेलिसांच्या जाळ्यात सापडले असता अधिक तपास सुरु आहे.
हे सट्टेबाज बेळगाव गोवा आणि कर्नाटकातही आपले जाळे पसरवून असल्याचा संशय आला असून त्याचाही शोध सुरू आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.