Thursday, April 18, 2024

/

सेवानिवृत्त कमांडन्ट कर्नल जे.डी. स्टॅनली यांचं निधन

 belgaum

मराठा लाईट इन्फंट्रीचे सेवानिवृत्त कमांडन्ट कर्नल जे.डी. स्टॅनली STAnleyयांचे वृद्धापकालाने बेळगाव येथे निधन झाले.२९ ऑक्टोबर १९२० रोजी जल्मलेले स्टॅनली स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १४ मार्च १९४३ रोजी १४ मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले होते.
कर्नल स्टॅनली यांनी दुसऱ्या महायुद्धात पर्शिया,इराक,सीरिया,पॅलेस्टिन आणि इजिप्तमध्ये आपल्या सैन्याच्या तुकडीसह मर्दुमकी गाजवली होती.मध्यपूर्वेत सेवा बजावल्यानंतर १९४६ मध्ये २ मराठामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आली.आपल्या सेवकाळात त्यांनी मुख्यालयासह अनेक ठिकाणी महत्वाची पदे भूषवली.
बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीचे कमांडट म्हणून स्टॅनली यांनी १९६८ ते १९७० कालावधीत सेवा बजावली.१९६९ मध्ये मिलिटरी महादेव येथे पॉप इन उपहारगृह सुरु करण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते.
शुक्रवारी स्टॅनली यांच्यावर अंत्यसंस्कार बेळगाव येथे करण्यात येणार आहे.उपलष्कर प्रमुख आणि मराठाचे कर्नल लेफ्टनंट जनरल पी.जे.एस.पन्नु हे अंत्यविधीप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.शुक्रवारी शरकत  युद्ध स्मारक येथे मराठातर्फे त्यांना आदरांजली वाहिली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.