belgaum

मुलीच्या गुन्ह्याची झळ; आईची आत्महत्या

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : २ कोटी रुपयांच्या विमा रकमेसाठी आपल्या माजी सैनिक पतीची हत्या केल्याच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या महिलेच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हुक्केरी तालुक्यातील घोडगेरी येथे घडली आहे.

समाजातील बदनामी आणि मानसिक तणावाला कंटाळून ६५ वर्षीय महादेवी बदामी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

सुमा मंजरगी हिने विम्याची रक्कम मिळवण्यासाठी प्रियकरासह इतर साथीदारांच्या मदतीने आपल्या पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. रुग्णालयात उपचार सुरू असताना सलाईनमधून विष देऊन हा कट रचण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणात यमकनमर्डी पोलिसांनी सुमासह सर्व आरोपींना अटक केली आहे.

 belgaum

मुलीच्या गुन्ह्यामुळे कुटुंबाची समाजात मोठी बदनामी झाल्याने महादेवी बदामी या मानसिक नैराश्यात होत्या. घरात कोणी नसताना त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.

घटनेची माहिती मिळताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.