Friday, September 13, 2024

/

अंधश्रद्धा विरोधी एकत्रित लढा गरजेचा- अभिनेते प्रकाश राज

 belgaum

prakash rajमानव बंधुत्व मंचतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण  दिन संकल्पदिन म्हणून पाळण्यात आला.यानिमित्त मानव बंधुत्व मंचातर्फे अंधश्रद्धा विरोधी संकल्प कार्यक्रमाचे आयोजन सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत आयोजित करण्यात आले होते.
अभिनेता प्रकाश राज ,माजी पालकमंत्री आमदार सतीश जारकिहोळी ,निष्कला मंडपाचे स्वामी निजागुणानंद ,जे एन यु चे प्राध्यापक डॉ. पुरुषोत्तम बिलिमळे आदींनी ढोलवादन करून संकल्पदिन कार्यक्रमाची सुरुवात केली.समाजातील अंधश्रद्धा आणि भोंदूबाजी बंद करून समाजाला दिशा देण्याचे कार्य संकल्प दिनामुळे होत आहे.समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सगळ्यांनी एका व्यासपीठावर येण्याची आवश्यकता आहे,असे प्रतिपादन डॉ.पुरुषोत्तम बिलिमळे यांनी याप्रसंगी बोलताना केले.
याप्रसंगी विविध ठिकाणाहून आलेल्या कलापथकानी आपली कला सादर केली.कार्यक्रमासाठी स्मशानभूमीत भव्य मंडप घालण्यात आला होता.स्मशानातच आलेल्या कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.पुस्तकविक्रीचा स्टॉलही स्मशानभूमीत मांडण्यात आला होता.जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते वाहनातून संकल्प दिन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते.एका बाजूला मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात होते आणि दुसरीकडे संकल्पदिन कार्यक्रम सुरु होता.

अंधश्रद्धा विरोधी एकत्रित लढा गरजेचा- प्रकाश राज

अंधश्रधा विरोधात सगळे जन एकत्र लढण्याची गरज आहे अस मत अभिनेता प्रकाश राज यांनी व्यक्त केले हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हे एकच असून या नवीन प्रकारच्या अंधश्रद्धा आजच्या समाजात रुजल्या आहेत आम्ही यावर जनजागृती करन देखील गरजेचे आहे से ते म्हणाले. मला उजव्या शक्ती कडून मिळालेल्या धमक्यांना मी भिक घालणार नसून मी बोलतच राहीन मी घाबरलो नसून मला सुरक्षेची गरजही नाही अस देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.