Sunday, April 28, 2024

/

घमेंडखोर पालिका आयुक्तामुळे जनतेला त्रास –नगरविकास सचिवाकडे तक्रार

 belgaum

बेळगाव महा पालिकेचे आयुक्त आणि नगर योजना अधिकारी घमेंडखोर असल्याने याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे अशी तक्रारनगरविकास खात्याकडे नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केली आहे.

सुवर्ण सौध येथे गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिवांना पत्र लिहून सदर तक्रार केली आहे. रामदेव गल्लीत इमारत बांधण्यास परवानगी मागितली असता सर्व कागद पत्रे जोडून देखील पालिका आयुक्त नगर योजना अधिकारी नाहक त्रास करत आहेत अस तक्रारीत म्हटलं आहे.

इमारत पाडवा मगच परवानगीसाठी अर्ज करा अस पालिकेच्या वतीने इमारत परवानगी मागणाऱ्या अर्ज धारकास सांगितलं जात आहे यामुळे जनतेचे पैसे वेळ अधिक वाया जात आहे असं देखील तक्रारीत म्हटलं आहे.ठराविक मुदतीत कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाते म्हणून प्रसार माध्यमात छापून येते पण प्रत्यक्षात ठराविक कालावधीच्या आत परवानगी दिली जात नाही.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.