Sunday, April 28, 2024

/

आली आली रे जयकांत शिकरे तुझी पाळी आली ‘सिंघम’ ला वाढतेय सहानभूती

 belgaum

जावेद मुशाफिरींच्या पाठीशी आम्ही आहोत

शहापूर पोलीस स्थानकाचे सीपीआय *जावेद मुशाफिरी* यांना कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर *जायंट्स ग्रुप ऑफ बेलगाम मेन* त्यांच्या पाठीशी आहे. एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून अल्पावधीतच नावारूपास आलेले *जावेद मुशाफिरी* यांनी जाती भेद, धर्म , न मानता सर्वाना समान न्याय देत आपल्या कार्याची झलक त्यांनी दाखवून दिली, गरीब श्रीमंत भेदभाव न करता आपले काम ते करीत आहेत, मृदू बोलणं,प्रसंगी कठोर बोलणं हा मिलाप ते अगदी बेमालूम पणे वापरीत आहेत, त्यामुळे ते अल्पावधीत जनतेच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.

Cpi javed mushafiri
रात्री स्वतःची अशी वेगळ्या पद्धतीची गस्त ते आपल्या विभागात घालीत आहेत, त्यामुळे ते *सिंघम*या नावाने ओळखले जात आहेत.तर अशा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांच्या पाठीशी जायंट्स मेन आहे. चांगल्या कार्यास आमचा सदैव पाठिबा राहील असे सचिव महादेव पाटील यांनी सांगितले आहे.  बेळगाव live शी संपर्क साधून महादेव पाटील यांनी आपल्या संघटनेच्या वतीने पोईलीस निरीक्षकास पाठींबा दिला आहे. हळूहळू शहरातून जावेद यांना सहानुभूती मिळत असून पाठिंबा देखिल वाढत आहे.

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.