Saturday, July 13, 2024

/

 सोशल मीडियामुळे काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यात अडसर – जनरल रावत

 belgaum

gen bipin rawatप्रक्षोभक भाषण देऊन काश्मीर मधील तरुणांना भडकविण्याचे काम सुरूच असून सोशल मीडियामुळे काश्मिरात शांतता प्रस्थापित करण्यात अडचणी येत असतात पाकिस्तान कडून शांततेला तडा देण्याच काम सुरूच असतंय त्याठिकाणी कोणत्याही स्थितीत शांतता प्रस्तापित करण्याचे काम सुरूच आहे अस मत जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केल आहे.

मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या 23 आणि 24 बटालियनला राष्ट्रपती नी बहाल केलेला मानाचा ध्वज प्रदान कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.  जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्‍मीर असो वा डोकलाम देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय सेना सक्षम आहे. कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास आम्ही सज्ज आहोत अस देखील रावत म्हणाले.

लष्कराकडून कोणत्याही प्रकारे मानवाधिकारांचे उल्लंघन होत नाही. ती एक कारवाई असते.
डोकलाम मध्ये  भारतीय आणि चीनी सैन्यात समोरासमोर खडाखडी झाली नाही. आमच्या जवानांचे मनोबल जबरदस्त असल्यामुळे कोणत्याही परिस्थितिला आम्ही सामोरे जाऊ शकतो. जवानांनाही ताण असतो. घरगुती समस्यांमुळे काही जवानांनी आत्महत्या केली. पण आम्ही सर्व एक कुटुंबच असल्याची वागणूक जवानांना मिळत असते. त्यामुळे आमच्या पराक्रमाबाबत कोणीही बोट रोखू शकत नाही. यावेळी रावत यांनी मराठा लाईट इन्फंट्रिच्या कामगिरीबाबत माहिती सांगितली.

उत्तर कोरिया ही त्यांची समस्या 
उत्तर कोरियाने घेतलेल्या अणू चाचणीबाबत लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना विचारले असता ते म्हणाले, उत्तर कोरियाने घेतलेली अनुचाचणी आणि त्याला असलेला अमेरिकेचा विरोध याबाबत मी अधिक बोलू शकत नाही. ही त्यांची बाब आहे. हि एक जगाचीच समस्या आहे  त्यावर आपले सरकार, परराष्ट्र खाते निर्णय घेईल अस देखील म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.