बिग बॉस कन्नड मध्ये बेळगाव कन्या श्रुती प्रकाश

0
 belgaum

SHruti१५ ऑक्टोबर पासून कन्नड बिग बॉस ची पाचवी मालिका सुरू झाली. कंटेस्टंट क्र ५ श्रुती प्रकाश ची घोषणा झाली तेंव्हा अनेकजण तिला ओळखतही नव्हते, पण तिच्या आवाजाने तिने साऱ्यांचेच हृदयं काबीज केली आहेत.
श्रुती एक गायिका आणि अभिनेत्री. लवकरच कन्नड चित्रपटात ती पदार्पण करेल. साथ निभाना साथीया सारख्या हिंदी मालिकांत तिने काम केले आहे. ती बेळगावची, सध्या मुंबईत राहते आणि सध्या कर्नाटकात ती अनेक दिलांची धडकन बनली आहे.
श्रुतीने राधा ही बावरी या मालिकेतही काम केले आहे. जब हॅरी मेट सेजल व रॉक ऑन सारख्या चित्रपटांची शीर्षक गीते म्हटली आहेत.
वडील लष्करी अधिकारी असल्याने पटियाला, बिकानेर, बबिना, तेजपुर, अहमदनगर, बल्लारी येथील केंद्रीय विद्यालयात तिचे शिक्षण झाले.
रुरकी येथे जन्मली तरी बेळगाव येथे तिचा बराच काळ गेला आहे. तिचे वडील लेफ्टनंट कर्नल प्रकाश हे २३ वर्षीय देशसेवेतून निवृत्त झाले आहेत. तिने जैन कॉलेज मधून बारावी तर पीपल ट्री कॉलेज मधून पदवी शिक्षण घेतले आहे. ती उत्तम बॅडमिंटन प्लेयर असून सलग दोनदा राणी चन्नम्मा विध्यापिठाची युनिव्हर्सिटी ब्लू ठरली आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.