Friday, March 29, 2024

/

चर्चेतलं हस्तांदोलन…

 belgaum

राज्य काँग्रेसच्या मोठ्या पदावर असलेली महिला आणि तालुका समिती मधील एक माजी आमदार या दोघांतील हस्तांदोलन चर्चेत आहे.
बेळगाव तालुक्यातील एका गावचं निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित जमले असताना हे हस्तांदोलन झालं आहे.चार चौघात आल्यावर त्या महिला नेत्याने सर्वां समोरच भैय्या आप मुझे चाहिए असं म्हणत हस्तांदोलन करण्यासाठी हात पुढं केला मात्र तालुका समीतीत कार्यरत या नेत्याने दबकून हात मागे झटकले , मात्र शेवटी महिला नेत्यांनी जबरदस्ती आपले हात पुढे केलेच,  यावेळी उपस्थित  छायाचित्रकार आणि  ग्रामीण भागातील नेते बघतच राहिले.
वास्तविक पाहता हस्तांदोलन साठी हात पुढे केल्यावर आपणही हात देऊन हस्तांदोलन करणं सौजन्य असतंय मात्र समितीच्या या नेत्यांकडून तसं न केल्याने याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू होती.महिला नेत्यांना निवडणुकीत मदत केल्याचा आणि मराठी संघटनेतील अनेक कार्यकर्ते गळाला लागल्याने त्या राष्ट्रीय पक्षात जाणाऱ्या कार्यकर्त्यांना न अडविल्या मुळे अगोदरच  जनतेतून टीकेचे लक्ष झालेला नेता आतून सेटिंग च्या आरोपातही अडकत आहे, यामुळे उघड उघड हात मिळवल्यास ते दचकले असावेत अशी चर्चा सुरू आहे.

2 COMMENTS

  1. अहो दारुबंदिसारख्या एका चांगल्याकामासाठी आपापले पक्ष भेद सोडून असे नेते समाजहितासाठि जर एकत्र एत असतील तर मीडियाला का ह्याचा त्रास होतोय?? व काही मीडीया हि नेहमीच विषय सोडून चर्चा करते विषय कोणता आहे याच गांभीर्यहि मीडीयाला नसत. नेहमीच लोकांमध्ये विष पेरण हे आजकालची मीडीया करत आली आहे. आज समाजामधे चांगल कार्य किंवा लोकहितासाठी ऊचललेल एखाद पाऊल कोणता पक्ष किंवा कोणती संघटना करते हे महत्त्वाच नाही, जर का आपल्या लढ्यामुळे गोरगरीब जनता त्रासापासून मुक्त होत असेल तर आपण पक्ष, संघटना या सर्व गोष्टी बाजूला ठेवून असे लोक एकत्र येणे महत्त्वाच आहे. आणि अशाच लोकांना आपण आपले नेते किंवा लीडर म्हणू शकतो, बाकीचे सगळे गलिच्छ राजकारण करत बसतात आणि आपली क्वचित मीडीया यातील सत्य माहीत असुन देखील असत्याचा आरसा लोकांसमोर ऊभा करतात. व लोकांची दिशाभूल करण्यात स्वताचाच वाटा जास्त असल्याचे सिद्ध करतात कु्पाकरुन हे थांबवा हे 21 वे शतक आहे सर्व जनता समंजन्स बनली आहे खरं काय व खोटे काय हे मीडीयावरुन ठरत नसत…. काही मीडीयांना तर लोक मनोरंजन म्हणून बघण्याचा प्रयत्न करतात खरतर “मीडीया” ही आपल्या देशाच्या संविधानाचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असुन सतत आपल्या देशातील जनतेच्या विकासासाठी त्यांच्या समस्या समाजामधे मांडण्यासाठी सतत कार्यबध्द असते व अशा मीडीयांच्या कामगिरीमुळे आज आपला देश जगात एक आपली वेगळी ओळख करू ईच्छीतो. पण काही राजकीय पक्षांतर्गत मीडीया चालवल्या जातात तरी अशा मीडीयामुळे मीडिया क्षेत्रात एक अपमानास्पद वातावरण निर्माण होते व कुठेतरी आपल्या देशाच्या विकासात अडथळा येण्याच कारण देखील हेच ठरत ………..कु्पया या संपूर्ण विषयाला गांभीर्याने घेणे आजची काळाची गरज आहे.

    • अहो दारुबंदिसारख्या एका चांगल्याकामासाठी आपापले पक्ष भेद सोडून असे नेते समाजहितासाठि जर एकत्र एत असतील तर मीडियाला का ह्याचा त्रास होतोय?? व काही मीडीया हि नेहमीच विषय सोडून चर्चा करते विषय कोणता आहे याच गांभीर्यहि मीडीयाला नसत. नेहमीच लोकांमध्ये विष पेरण हे आजकालची मीडीया करत आली आहे. आज समाजामधे चांगल कार्य किंवा लोकहितासाठी ऊचललेल एखाद पाऊल कोणता पक्ष किंवा कोणती संघटना करते हे महत्त्वाच नाही, जर का आपल्या लढ्यामुळे गोरगरीब जनता त्रासापासून मुक्त होत असेल तर आपण पक्ष, संघटना या सर्व गोष्टी बाजूला ठेवून असे लोक एकत्र येणे महत्त्वाच आहे. आणि अशाच लोकांना आपण आपले नेते किंवा लीडर म्हणू शकतो, बाकीचे सगळे गलिच्छ राजकारण करत बसतात आणि आपली क्वचित मीडीया यातील सत्य माहीत असुन देखील असत्याचा आरसा लोकांसमोर ऊभा करतात. व लोकांची दिशाभूल करण्यात स्वताचाच वाटा जास्त असल्याचे सिद्ध करतात कु्पाकरुन हे थांबवा हे 21 वे शतक आहे सर्व जनता समंजन्स बनली आहे खरं काय व खोटे काय हे मीडीयावरुन ठरत नसत…. काही मीडीयांना तर लोक मनोरंजन म्हणून बघण्याचा प्रयत्न करतात खरतर “मीडीया” ही आपल्या देशाच्या संविधानाचा व लोकशाहीचा आधारस्तंभ असुन सतत आपल्या देशातील जनतेच्या विकासासाठी त्यांच्या समस्या समाजामधे मांडण्यासाठी सतत कार्यबध्द असते व अशा मीडीयांच्या कामगिरीमुळे आज आपला देश जगात एक आपली वेगळी ओळख करू ईच्छीतो. पण काही राजकीय पक्षांतर्गत मीडीया चालवल्या जातात तरी अशा मीडीयामुळे मीडिया क्षेत्रात एक अपमानास्पद वातावरण निर्माण होते व कुठेतरी आपल्या देशाच्या विकासात अडथळा येण्याच कारण देखील हेच ठरत ………..कु्पया या संपूर्ण विषयाला गांभीर्याने घेणे आजची काळाची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.