फेसबुकच्या माध्यमातून तरुणी आणि विवाहित महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून शारीरिक आणि आर्थिक फायद्याची मागणी करणारा एक विकृत तरुण पोलिसांच्या हातात लागला, ही बातमी वाचून ज्यांना आया बहिणी आणि बायको आहे ते सारे हादरलेच असतील, हादरायलाच पाहिजे, कारण विषयच तसा सुरू आहे एकमेकांना जोडण्यासाठी चांगल्या उद्देशाने तयार करण्यात आलेले फेसबुक सध्या ट्रॅपबुक बनत चालले आहे आणि भगिनींनी खरे सावध होण्याची गरज आहे.
आजकाल फेसबुकवर असण्याची, आपण रोजच्या रोज काय काय करतो हे त्यावर घालण्याची फॅशन सुरू आहे, या फॅशन मध्ये आपण आपली खासगी माहिती उघड करत आहोत याची कल्पना येत नाही, आणि आम्ही फसत जात आहोत. यातून चोऱ्या होतात, चोरटेही फेसबुक बघून ट्रॅप करतात यात सम्पत्तीचा नाश होतोय, आम्ही घरी नाही हे फेसबुक वर घालून मोकळे होतो आणि मग कप्पाळावर हात मारून घेत बसतो.
अशाच ट्रॅप मधून जर अब्रू जात असेल तर भानावर यायची वेळ आहे. सुंदर चेहरा बघून फेसबुक वर अनेकजण friend request पाठवतात. आमच्या भगिनीही आपले friend जास्त करण्याच्या स्पर्धेत त्या request स्वीकारतात आणि इथेच ट्रॅप करण्याची सुरुवात होते. हाय हॅलो करत करत chat, मग हळूच सौन्दर्याचे कौतुक आणि समोरची महिला मुलगी भाळली की sex chat करत करत वेगवेगळे आक्षेपार्ह फोटो मागितले जातात. हे फोटो आपण कसे पाठवले याचे भानच राहिले नाही असे आपल्या भगिनी सांगतात मात्र तोपर्यंत वेळ गेलेला असतोय. मग समोरून ब्लॅकमेल आणि इकडून अब्रू वाचवण्याचे प्रयत्न होतात, ज्या महिला इतरांना सांगायला घाबरतात त्यांना मग शारीरिक आणि आर्थिक सुख द्यावे लागते, बाहेर बोलले तर इज्जत जाईल ही भीती असते.
आजकाल हे प्रकार आणि विकृती वाढत आहे, प्रकारात फक्त मुले किंवा पुरुषच आघाडीवर आहेत असे नाही, तर मुली आणि महिलाही अशाच प्रकारे पुरुषवर्गाला ट्रॅप करत आहेत, अशा स्थितीत आपण ट्रॅप होणार नाही याची काळजी घ्यायची गरज आहे, पुरुष ट्रॅप झाला की तो लागलीच दुसर्याची मदत घेतो, बायकांच्या बाबतीत इज्जत, अब्रू, घराण्याची अब्रू अशे प्रकार समस्या वाढवत जातात म्हणून भगिनींनो फेसबुक वापरताना जास्त भान ठेवा हीच बेळगाव live ची तुम्हाला विनंती