Wednesday, May 8, 2024

/

मोराच्या पिल्लास जीवनदान

 belgaum

Peocockभटक्या कुत्री पाठलाग करत असलेल्या एका मोराच्या पिल्लास जीवनदान देण्याचं काम टिळकवाडी येथील रहिवाशी सुनील मुरली आणि माजी महापौर विजय मोरे  यांनी केलं आहे.

गुरुवारी सकाळी सुनील हे वॅक्सिन डेपो परिसरात  मॉर्निंग वॉक साठी गेले असता काही भटकी कुत्री मोराच्या पिल्लाचा पाठलाग करत होती त्यावेळी सुनील यांनी सदर मोर पिल्लाची सुटका कुत्र्यांच्या तावडीतून केली आणि लागलीच माजी महापौर विजय मोरे यांना संपर्क साधला त्यांच्या हवाली केले.

विजय मोरे यांनी त्या बचावलेल्या मोराच्या पिल्लास वन खात्याच्या स्वाधीन केलं वन खात्याने  मोर भूतरामहट्टी येथील पक्षी धामात सोडून दिलं आहे. मोर वन खात्याकडे स्वाधीन करतेवेळी डी एफ ओ बसवराज पाटील,ए सी एफ शिवानंद नायकवाडी, ए सी एफ तलवार आदी उपस्थित होते. मोराचा जीव वाचवलेल्या सुनील मुरली यांच्या पक्षी  प्रेमाचं कौतुक होत आहे

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.