म्यानमार मधील रोहिंग्या मुस्लिम बांधवांची कत्तल रोखा अशी मागणी करत सोमवारी बेळगावातील हजारो मुस्लिम बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यलयावर मोर्चा काढला होता .वास्तविक गेल्या शुक्रवारी देखील मुस्लिम समाजातल्या काही राजकीय पुढाऱ्याच्या नेतृत्वात एकदा मोर्चा काढून म्यानमार घटनेचा निषेध करण्यात आला होता मात्र दोन दिवसातच पुन्हा दुसरा भव्य मोर्चा काढला गेला अस का झालं..दोन मोर्चे का निघाले याचा आढावा घेण्याचा प्रयत्न बेळगाव live ने केला आहे.
शुक्रवारच्या मोर्चात शे पाचशे लोकांची उपस्थिती होती मात्र पुन्हा सोमवारी राजकारण विरहित मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला अभूतपूर्व यश मिळालं आणि 20 हजार हुन अधिक मुस्लिम बांधवांनी यात सहभाग घेतला.हा मोर्चा शांततेत झाला मोर्चाचे श्रेय मुस्लिम वोट बँक वापरणाऱ्या राजकीय नेत्यास मिळालं नाही हा मोर्चा यशस्वी होण्या मागे धर्मगुरू आहेत याच श्रेय देखील धर्मगुरूंना मिळाल आहे.
वास्तविक रित्या एकाच विषयासाठी दोन मोर्चाची गरज नव्हती मात्र पहिल्या मोर्चाच्या मागे राजकीय नेते होते म्हूणून राजकीय नेत्यांना शह देण्यासाठी धर्मगुरू पुढे आणि राजकीय नेते मागे हे चित्र यातून दिसलं आहे.
शुक्रवारी काढलेल्या मोर्चाचा राजकीय स्वार्था साठी वापरला जाणार म्हणून मुस्लिम लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र सोमवारी मौलाना
सय्यद मुनीर पाशा इनामदार यांनी आवाहन केल्यावर हजारो लोक रस्त्यावर उतरले होते त्यांचं एक नेतृत्व मुस्लिम समाजा समोर आलं आहे
बेळगावतल्या मुस्लिम समाजावर मौलाना मुनीर पाशा यांची वाढलेली पकड भविष्यात मुस्लिम मतांचा वापर करू पाहणाऱ्यांना धोक्याची घंटा आहे या अगोदर राजकारण्या कडून समाजाचा वापर होत होता मात्र बेळगावात एकाच विषयावर दोन मोर्चे झाल्याने आगामी दिवसात सर्वच कार्यात धर्मगुरूंची भूमिका वाढली आहे.समाज कल्याण आणि समाज हित धर्म गुरू पूढे येतील नवीन नेतृत्व मिळेल यात शंका नाही.