Wednesday, April 24, 2024

/

बेळगावात आढळला रंगहीन दुर्मिळ धामण सर्प

 belgaum

रंगहीन असा अतिशय दुर्मिळ धामण सर्प बेळगावातील भाग्यनगर सहावा क्रॉस येथील मधु हलशिकर यांच्या कंपाऊंड मध्ये आढळला आहे. हलशिकर यांच्या कंपाऊंड मध्ये शिरल्यावर सर्प मित्र आनंद चिट्टी यांना पाचारण करण्यात आले कंपाऊंड मधील इलेक्ट्रिकल बॉक्स मध्ये बसलेल्या बसलेल्या त दुर्मिळ सापास आनंद चिट्टी यांनी मोठ्या शिताफीने पकडलं. CHittiआज पकडलेला हा दुर्मिळ सर्प लाख सर्पां तुन एक आढळतो रंगहीन (albino snake) अस देखील त्याला संबोधन केलं जातंय.अनगोळ येथील सह्याद्री कॉलनीत देखील असा सर्प सहा महिन्यांपूर्वी पकडला होता अशी माहिती सर्प मित्र आनंद चिट्टी यांनी बेळगाव live ला दिली आहे.

रंगहीन albino म्हणजे काय?
सर्पाचा मुळ रंग जाऊन त्या त्या ठिकाणी पांढरा गुलाबी पिवळसर रंग प्राप्त होतो त्वचेतील मिलेनियम च प्रमाण कमी झाल्याने हा त्वचा रोग होतो मात्र यामुळे सर्पाला सौन्दर्य अधिक खुलल गेल्याने शापित सौन्दर्य म्हटलं जातं.
या त्वचेच्या विकारामुळे सर्पाना ऊन किंवा थंडी अधिक त्रास होतो त्वचे बरोबर डोळे जीभ देखील गुलाबी लाल रंगाची होते त्यामुळं दृष्टी कमकुवत होते या रंगा मुळेच असे सर्प शत्रूच्या नजरेस पडतात असे सर्प जास्त दिवस जगत देखील नाहीत अशो माहिती  देखील आनंद चिट्टी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.