Friday, March 29, 2024

/

डॉल्बी मुक्त गणेश उत्सवाचा निर्धार केलेलं टेंगिनकेरा गल्लीच मंडळ

 belgaum

एकीकडे अनेक गणेश मंडळ डॉल्बी लावण्यासाठी आग्रही असताना टेंगीनकेरा गल्लीतील राजगुरू चौक गणेश मंडळान यावर्षी डॉल्बी मुक्त गणेश उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.TEnginkera galliमार्केट पोलीस ए सी पी शंकर मारिहाळ यांची राष्ट्रपती पदकांसाठी निवड झाल्याने या मंडळाने त्यांचा सत्कार केला यावेळी कार्यकर्त्यांनी डॉल्बी मुक्तीचा निर्धार केला आहे. या मंडळाने डॉल्बी मुक्त गणेश उत्सवाचा निर्णय घेतल्याने पोलीस दलाच्या वतीनं मारिहाळ यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा देखील सत्कार केला.

डॉल्बी मुक्तीचा निर्णय स्वागतार्ह असून याचा आदर्श इतर मंडळांनी घ्यावा असे आवाहन मारिहाळ यांनी यावेळी केला. यावेळी सतीश घसारी,मारुती निलजकर,गजानन डोंगरे,भरत देवजी,मल्लिकार्जुन बेलापूर ,विजय मोहिते आदी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.