Saturday, April 20, 2024

/

मिलिटरी डेअरी फार्म बंद करू नका – आंदोलना द्वारे राम सेनेचा केंद्र सरकारला इशारा

 belgaum

बेळगाव शहराच्या इतिहासात भर घालणाऱ्या मराठा रेजिमेंटच्या मिलिटरी डेअरी फार्मला(गो शाळा) कोणत्याही स्थितीत बंद करू नये आशी आग्रही मागणी करत श्री राम सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन केली. गेली १०० हून अधिक वर्ष बेळगावातील मिलिटरी डेपोत गो शाळा (मिलिटरी डेअरी फार्म) सुरु आहे

केंद्रीय संरक्षण खात्याने देशातील सर्व डेअरी फार्म आता बंद करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे बेळगावसह देशातील 39डेअरी फार्म आता आगामी तीनमहिन्यात बंद होणार आहे. बेळगाव फार्म देखील बंद होणार अशी बातमी बेळगाव live ने ११ आगष्ट रोजी दिली होती.

SAve military farmबुधवारी श्री राम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांच्या नेतृत्वात शेकडो राम सेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केल. जिल्हाधिकारी जिया उल्ला यांच्या द्वारे पंत प्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण प्रभारी मंत्री अरुण जेटली यांना निवेदन दिल आहे .

भारतीय लष्कर आणि शेतकरी हा देशाचा कणा आहेत अश्यात ऐतिहासिक अस डेरी फार्म बंद करण्याचा आदेश दिला गेला आहे हा आदेश मागे घेतला नाही तर राम सेना तीव्र आंदोलन करूळ असा इशारा मुतालिक यांनी दिला आहे. यावेळी  बेळगाव राम सेनेचे रमाकांत कोंडुसकर सह अन्य कार्यकर्ते महिला वर्ग उपस्थित होते .               बेळगावात देशातील सर्वात मोठा दुसरा मोठा डेअरी फार्म 1890 मध्येअलाहाबाद नंतर बेळगाव मध्ये स्थापित करण्यात आला होता. कॅम्प मध्ये बेळगाव राकसकोप रोड वर गणेशपूर येथे हे डेअरी फार्म आहे.गेल्या 127 वर्षा पासून या बेळगावातील सैन्य फार्म मधून लागणार दूध मराठा सेंटर आर्मी बेस आणि एअर फोर्स स्टेशन ला पुरविण्यात येत आहे.                              कॅम्प मधील सैन्याच्या खुल्या जागेत पसरलेल्या या डेअरी फार्म मध्ये 640 जनावर आहेत 50जणांचा यावर रोजगार देखील आहे.या शिवाय गवत कापणे वगैरे कामासाठी मोसमात 300लोकांना रोजगार असतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.