Thursday, April 25, 2024

/

विमानतळाच्या नव्या टर्मिनलची दिल्लीतील टीम कडून पहाणी

 belgaum

भारतीय विमान उड्डाण प्राधिकारणाच्या वतीने बनविण्यात येणाऱ्या बेळगाव विमान तळाच्या नविन टर्मिनल च्या उदघटनाची तयारी जोरात सुरू असून आगष्ट 23 रोजी याच उदघाटन होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकारणाचे अध्यक्ष डॉ गुरुप्रसाद मोहपात्रा सह योजना सदस्य सुधीर रहेजा तसेच नवी दिल्ली मुख्यालयातील टीम संजीव जिंदल(अभियांत्रिकी विभागाचे जी एम),चारुलता(आर्किटेक्चर विभाग सहाययक एम डी) यांनी पाहणी करून लवकरात लवकर नवीन टर्मिनल उदघाटन करण्यासाठी पाऊल उचलली आहेत. Bgm air portया टीम नवीन टर्मिनल भवन तसेच तांत्रिक भवनाची पहाणी केली. यावेळी बेळगाव विमानतळ राजेश मौर्य, अभियंता उमेश शर्मा,मोहम्मद कासीम,अनिल श्रीवास्तव,टी सी कांबळे आणि सी एन एस अधिकारी अन्य उपस्थित होते.

विमान उशिरा असल्यास प्रवाश्यांना विमान तळावर मनोरंजनाचा उद्देश्य ठेऊन देश विदेशातील पेंटिंग्ज,विविध भागांतील संस्कृतीची माहिती प्रदर्शन ठेवण्यात येणार आहे. प्रवाश्यांना पाणी चांगली बैठक देखील आयोजित करण्यात येणार आहे.एकूणच बेळगाव विमान तळ सुशोभित करण्यात येणार असून उत्तर कर्नाटकातील एक सुंदर विमान तळ बनवणार असल्याचे देखील विमान प्राधिकरण अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.