Friday, March 29, 2024

/

घुसमट-वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobatकाही माणसांचे स्वभाव अगदी पारखी व्यक्तीलाही कळत नाहीत. अशा माणसांच्या मनातील गोष्ट त्यांच्या चेहर्‍यावर अजिबात उमटत नाही. त्यांच्या मनातील भावना अगदी त्यांच्या पत्नीला किंवा पतीलाही कळत नाहीत. वरकरणी अशा व्यक्ती जॉली, विनोदप्रिय असतात. पण मनातील दुःख इतरांशी कधीच शेअर करत नाहीत. मनातल्या मनात कुढत राहतात. त्यांना आपल्या भावना, दुःख इतरांसमोर व्यक्त करता येत नाही. किंबहुना व्यक्त करावेसे वाटत नाही. अशा लोकांची घुसमट वाढून त्याचे रूपांतर एखाद्या गंभीर आजारात होण्याची शक्यता असते. एखाद्याच्या आयुष्यात दुःख नसेल व असा स्वभाव असेल तर मग काही बिघडत नाही. पण संकटमय क्लेशमय जीवन असेल तर मनावरचा ताण वाढत जाऊन एकदम स्फोट होण्याची शक्यता असते. व्यक्त होता येत नसेल आणि ताण सहनही होत नसेल आणि हसरा मुखवटा ठेवायचा असेल तर?
मनाचा कोंडमारा केल्याने पेशीसंरचनेत बिघाड होऊन ब्लउ प्रेशर, डायबेटीस असे रोग, कॅन्सरसारख्या व्याधी होऊ शकतात. आपल्या समाज रचनेमध्ये स्त्रीला फारसे स्वातंत्र्य नाही. तिला आपले विचार, भावना, इच्छा, मुक्तपणे मांडता येत  नाहीत. मग अस्वस्थता, चिडचिड, नैराश्य निद्रानाश असे विविध मनोविकार ग्रासतात.

तेजस्विनी घर आणि नोकरी सगळ्या जबाबदार्‍या सांभाळून मोटाकुटीला आलेली. चिडचिड, निद्रानाश थकवा तर जाणवायचाच शिवाय तिला अलीकउे पीएमएसचा त्रास होऊ लागला. म्हणजे पाळी येण्याआधी भयंकर चीडचीड होणे, आरडाओरड करणे, उगीचच रडणे, मुलांवर नवर्‍यावर आगपाखड करणे, उगीचच रडणे, मुलांवर नवर्‍यावर आगपाखड करणे, अशी लक्षणं जाणवायची. त्याशिवाय अंग सुजणे, स्तनात वेदना होणे, डोकं दुखणे, उलट्या होणे असाही त्रास व्हायचा. स्त्राव सुरू झाला की एकदम सगळं नॉर्मल. जणू काही झालंच नाही.
सगळे उपचार झाले परंतु काहीही फरक नाही. ऍज युज्वल, सगळ्यात शेवटी होमिओपॅथीचा पर्याय! तिला होमिओपॅथिक मेडिसिनबरोाबर पुष्पौषधीही दिल्यावर अक्षरशः जादू केल्यासारखी केस बरी झाली.

तेजस्विनीचं झालं काय! नोकरी करायची म्हटल्यावर नोकरीच्या ठिकाणी व्यवस्थित काम केलंच पाहिजे. घरी सर्वांची मर्जी सांभाळायची म्हणजे हसतच घरच्या कामांचा फडशा पाडला पाहिजे. मुलं, पतिराज यांच्या सेवेत कमी पडून कसं चालेल? आला गेला, सासरमाहेरचा पाहुणा, सणवार, सासुसासर्‍यांची सेवा झालीच पाहिजे. स्वतःसाठी वेळ कुठला? घुसमट होऊन शेवटी शारीरिक तक्रारी होऊ लागल्यावर दखल घेतली गेली. प्रत्येक स्त्रीने जरूर कष्ट करावेत, हसतखेळत संसार सांभाळावा. ज्या लोकांना संघर्ष नको आहे. असे लोक संघर्षाच्या भीतपोटी आपल्या भावना दडवून, दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या मुखवट्याखाली ती व्यक्ती अतिशय अस्वस्थ जीवन जगत असते.
> आपण करतोय ते योाग्य नाही हे त्यांना कळेपर्यंत खूप उशीर होतो. दैनंदिन जीवनामध्ये आपण इतक्या नकारात्मक भावना आपल्या अंतर्मनामध्ये साठवत असतो की कधी ना कधी कोणत्या तरी विकाराच्या स्वरूपात किंवा विकृतीच्या स्वरूपात बाहेर पडतात. अशी मुलं वरवर खूप आनंदी दिसतात. बाहेरच्या लोकांसमोर अगदी समंजसपणे वागतात. पण घरी मात्र वेगळी असतात. घरातले वाद भांडणं यांच्या मनावर खोलवर परिणाम घडवतात. मोठ्यांचे वाद त्यांना अस्वस्थ अबोल बनवतात. अनेकवेळा एकटीच रडत बसतात, कोमेजल्यासारखी राहतात. पण मोकळं बोलत नाहीत. हसत नाहीत. जणू आपल्याच कोषात मिटून जातात. अशा बंदिस्त व्यक्तींना मोकळं करण्यासाठी उत्तम औषधं होमिओपॅथी मध्ये आहेत. अशा घुसमटलेल्या व्यक्तींना व्यसनाधीन होण्यास वेळ लागत नाही. हे टाळण्यसाठी बरोबर पुष्पौषधी दिल्याने दुहेरी फायदा होतो.

 belgaum

डाॅ.सोनाली सरनोबत

केदार क्लिनिक ०८३१-२४३१३६२
सरनोबत क्लिनिक ०८३१-२४३१३६४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.