Sunday, September 8, 2024

/

सांबरा एअरमन स्टेशन कमांडर पदी अरुण भास्कर गुप्ता

 belgaum

एअर कमोडोर अरुण भास्कर गुप्ता यांनी बेळगावच्या एअरमन ट्रेनिंग स्कुलच्या कमांडरपदाची  सूत्रे ग्रुप कॅप्टन एस . के . शर्मा यांच्याकडून शानदार समारंभात स्वीकारली . यापूर्वी एअरमन ट्रेनिंग स्कुलच्या कमांडरपदी ग्रुप कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्याकडे असायची पण आता त्या पदाची सुधारश्रेणी केल्यामुळे एअर कमोडोर पदाच्या अरुण गुप्ता यांची त्या पदावर नियुक्ती करण्यात अली आहे .

ARUN bhaskar guptaएअर कमोडोर  अरुण गुप्ता हे भारतीय वायू दलात १९८५ मध्ये दाखल झाले . एन डी ए पुणे येथून शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी वेलिंग्टन येथून संरक्षणातील उच्च शिक्षण घेतले . सिकंदराबाद येथील कॉलेज ऑफ वॉरफेरमधूनही उच्च प्रशिक्षण घेतले आहे . अरुण गुप्ता यांना ६८०० तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे . एकतीस वर्षाचा अनुभव असलेल्या गुप्ता यांनी आजवर अनेक जबाबदारीची पदे सांभाळली आहेत . येथे येण्यापूर्वी त्यांनी अंदमान ,पोर्ट ब्लेअर येथे सेवा बजावली आहे . त्यांच्या पत्नी गीताली गुप्ता यांनी देखील स्थानिक एअर फोर्स वाइव्स वेलफेर असोशिएशन पदाची सूत्रे याच समारंभात स्वीकारली .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.