Sunday, April 28, 2024

/

बेळगावात शिकलेले वेणुगोपाल अटर्नी जनरलच्या शर्यतीत

 belgaum

venugopal

देशाचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्या कार्यकालाचा अवधी १९ जून रोजी संपत असल्याने देशातील अनेक जेष्ठ वकील कायदे घटनात्मक तज्ञाची नाव अटर्नी जनरल पदाच्या शर्यतीत आहेत.सध्याचे देशाचे सॉलीसीटर जनरल रणजीत कुमार आणि आंतरराष्ट्रीय विधी तज्ञ हरीश साळवे या दोघांची नाव चर्चेत आहेत मात्र सध्या जेष्ठ वकील के के वेणुगोपाल यांच नाव देखील अटर्नी जनरल पदाच्या शर्यतीत आल आहे.

वेणुगोपाल यांनी राजा लखनगौडा लॉं कॉलेजमध्ये कायद्याची डिग्री पूर्ण केली होती .१९५४ मध्ये त्यांनी आपली वकिली सुरु केली होती तर १९७२ मध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणून कार्य सुरु केल होत.

 belgaum

पांडेचरी विधानसभा स्पीकर निवडणूक केस,१९७६ मध्ये करुणानिधी मंत्री बरखास्ती केस ,बाबरी मस्जिद केस,घटनेत अनेक नवीन तरतुदी करणाऱ्या केस सह अनेक हाय प्रोफाईल महत्वाच्या केस लढल्या होत्या.पद्म विभूषण,पद्मभूषण पुरस्कार प्राप्त देशात अधिक फीज घेणारे वकील म्हणून त्यांच्याकडे बघितल जातंय एका केस हजेरीला ते ५ ते १५ लाखा पर्यंत फीज घेत असतात.

सध्याचे सॉलीसीटर जनरल रणजीत सिंह हे एका पदावर आहेत तर जेष्ठ विधी तज्ञ हरीश साळवे यांनी या अगोदर माजी पंतप्रधान मन मोहन सिंह यांच्या काळात अटर्नी जनरल पद भोगले होते सध्या इच्छुक नाहीत त्यामुळे बेळगाव विध्यार्थी असलेल्या वेणुगोपाल के के यांच्या गळ्यातच अटर्नी जनरल पदाची माळ पडण्याची शक्यता अधिक आहे.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.