Saturday, May 4, 2024

/

पावसाची अखंड रीप रीप सुरू

 belgaum

बेळगाव शहरात पावसाची अखंड रीप रीप सुरू आहे. काल पासून सुरू असलेला पाऊस थांबत नाही, आणि शहर गारठले आहे. एकदाच ये आणि जोरात पडून जा असे पावसाकडे मागणे करत शहरवासी गाऱ्हाणे घालत आहेत.

Rain
पाऊस हा पाणी देणारा आणि शेतीला हवा असलेला एक घटक आहे, पावसाळा सुरू झाला की साऱ्यांचेच मन खुश होते पण पावसाळा मध्यावर आला की कधी संपतो हा पाऊस असे म्हणण्याची वेळ येते. सद्या या पावसाने जा रे जा रे पावसा म्हणण्याची वेळ आणली आहे.
दरवर्षी श्रावणापूर्वी पाऊस मनसोक्त पडून घेतो आणि श्रावणात कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ सुरू होतो. पाऊस पडून सगळीकडे हिरवेगार झालेले असते से वातावरण सगळीकडे आनंदाची नवी पालवी फोडणारे असते, पण हा पाऊस जर आलाच नाही तर हिरव्याच्या जागी सगळीकडे पिवळे होण्यास वेळ लागत नाही आणि पाऊस नाही हे मनाला पटतही नाही. सद्या पडणारा पाऊस हा दरवर्षीपेक्षा वेगळाच आहे. या पावसाने सगळीकडे चिखल आणि खड्डे पसरवून ठेवले आहेत. पाऊस ही एक अशी ओळख आहे की सारे स्वछ करणारी पण यंदाच्या पावसाने सगळे शहर घाण करून सोडले आहे. पाऊस आहे म्हणून आम्ही आहे पण पाऊस घरातून बाहेर पाय काढयला देत नाही त्यामुळे पावसा एकतर जोरात पड किंव्हा निघून जा असे म्हणण्याची वेळ बेळगाववासीयांवर आलीय.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.