Sunday, September 8, 2024

/

साहेब तुम्ही चुकलात, माफी मागा

 belgaum

Whts appतुम्ही अनेकांचे साहेब. महाराष्ट्र एकीकरण समितीला मानणारे अनेकजण तुम्हाला एक नेता म्हणून मानतात. अशावेळी तुम्ही अनेक महत्वाच्या पदावर बसलेले असताना इतका हीन कारभार शोभणारा नाही, ज्या संघटनेशी तुमचे नाव जोडलेले आहे त्या समितीशी ही प्रतारणा आहे. अतिशय नग्न अवस्थेतील त्या चुकीच्या पोष्टने तुम्ही आज लाखोंच्या भावनांशी खेळ केलात, साहेब तुम्ही चुकलात माफी तर मागाच शिवाय दिलगिरी व्यक्त करा. तरच समितीची प्रतिमा टिकेल.
साहेब तुम्ही माजी आमदार, असली अश्लील पोस्ट एक ग्रुप वर टाकून नसते उपद्व्याप करायची गरज नव्हती, झाली असेल चूक तर लगेच माफी मागून मोकळे झाला असता, पण तुम्ही भलतेच पर्याय निवडला, परवा परवा भाजपच्या एक आमदाराने असा प्रकार केला आम्ही बातमी घालून त्याच्या कृत्याचा निषेध केला, तुम्ही आमचे, पण आज आम्हाला तुमची लाज वाटते, आम्हाला वर तोंड करून फिरायची लायकी तुम्ही तुमच्या आंबट आणि अश्लील कृत्यांनी शिल्लक ठेवली नाहीत.
साहेब तुम्ही ज्या ग्रुप वर हा प्रकार केला त्याचा तरी विचार करा, युवकांना नवं प्रेरणा देण्याच्या ग्रुप वर तुम्ही नग्नतेचा बाजार मांडलाय, नंतर तुम्ही स्वतःचे वजन वापरून नको ते प्रयत्न केलेत, कन्नड माध्यमांची बातमी आल्यावर आम्हाला असंख्य वेदना झाल्या, तुमच्या सारखा एक जबाबदार माणूस इतक्या बेजबाबदार पणे वागेल याची आम्हाला कल्पना नव्हती, चूक मानून मोकळे झाला असता तर तुमची आमची सगळ्यांचीच अब्रू वाचली असती, तुम्ही मात्र प्रत्येक ग्रुप मधून पळ काढण्यात मोठेपण माणलेत, तुम्हाला सामान्य कार्यकर्ते आणि समितीच्या इज्जतीची जराही काळजी वाटली नाही?
इतके अश्लीलपन बरे नव्हे साहेब, अजूनही वेळ गेली नाही माफी मागा आणि इभ्रत वाचवा नाहीतर तुमच्या बरोबर आम्हीही नग्न होऊन अब्रू काढून घ्यावी लागेल.

 belgaum

2 COMMENTS

  1. माझ्या नावाने चालवत असलेला ग्रुप *नवक्रांती युवक मंडळ देसूर*
    मा मनोहर किणेकर साहेबांशी आमचे आत्मियतेचे संबध आहेत आणी त्यांच्यावर असे खोटे आरोप करुन आम्हाला पापात पडायचे नाही.पण याचा आणी ग्रुपचा गैर फायदा घेऊन कांहीनी मा किणेकर साहेबांच्या नावाने खमके पुरावे नसतानां जनतेत वाईट बातम्या व निदंनीय चित्रफित (जीचा त्यांच्याशी काहिही संबध नाही) इतर ग्रुप व पत्रकार बंधुना भडकावण्यासाठी पाठवून ग्रुपचा गैर उपयोग करत आहेत.पण अशा अफवा व बातम्या या निखलास खोट्या आहेत.तेंव्हा कोणीही मा मनोहर किणेकर सांहेबांच्या विरोधात आलेल्या अशा सरासर खोट्या बातम्यावर विश्वास ठेऊ नये अशी मी व माझ्या ग्रुपच्या वतिने कळकळीची विनंती.
    *प्रविण*

  2. *जाहिर निषेध निषेध निषेध*
    फक्त ग्रामीण भागच नव्हे तर समस्त सीमाभागातील निष्ठावान जनतेच्या तनामनात आदराचे स्थान निर्माण केलेले माजी आमदार आ मनोहर किणेकर साहेबांवर पुरावे नसतांना कांही नतद्रष्ट हरामखोर खोटेनाटे आरोप करुन बातम्या पसरवताहेत हे सपशेल खोट आहे.कारण अलिकडे किणेकर साहेबांचे काम पाहून अनेकांच्या पोटात बिबा पडलाय.सोशल मिडीया नेटवर *वाट्सअप वेब*म्हणून एक पर्याय आहे तो वापरुन दुसर्या कोणाच्याही नावाने अष्लिल चित्रफित असेल त्याचे नाव काढून त्यात आपल्याला जर कोणाच्या नावाची बदनामी आणी अब्रु काढायची असेल तर त्यांच नाव घालून वापरता येत.अशी सोय आहे अस कळतय.पण खासकरुन सीमाप्रश्नी आपण मतभेद असतील पण मनभेद असता कामानयेत अस वागायच सोडून आपल्याच नेत्याबद्दल असे नालायक कृत्य करणार्याची बुध्दी येवढी भ्रष्ट झाली कशी ? का त्यांना प्रतिष्ठा किंवा पद दिल नाही म्हणून ? जे प्रामाणिकपणे काम करतात त्यांच्या पाठी प्रतिष्ठा लागते अस काम केल पाहिजे हे तिनपाटानां कधी कळणार ? निदान कोणीच्या नावाची बदनामी करत असतानां आधी खरे पुरावे ठेऊनच करावी अन्यथा तो जनतेत संस्कृतीहिन विकृत ठरवला जातो याची तरी लाज बाळगावी.
    अशा या विकृत विचारामुळे समितीमधे फुट पाडणार्यांची काय कमी नाही.पण मोबाइलच्या ज्या समुहावर असतो त्यातील सर्वांचा अपमान असतो हे जरूर ध्यानात ठेवा.टिका जरुर करा पण ती जनतेच्या भल्यासाठी असावी.पण दुसरा आपला मोठा होत असतांना आपण प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी थांबायच सोडून पाठित खंजीर खुपसणारे कधीच होऊनये.परत अशाने आपल्या समाजाचे अतोनात नुकसान होत राष्ट्रीय पक्षानां खतपाणी घालतोय हे समजण्यायेवढी अक्कल नसेल तर तोच काय त्याच्या पिढ्याही अशाच गद्दार असतील यात तिळमात्र शंका नाही.
    असो आ किणेकर साहेबाबद्दल ज्यांना पोटफुगी सुरु झाले त्यांचा जाहिर *निषेध निषेध निषेध*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.