नगर विकास मंत्री रोशन बेग यांनी मराठी लोकप्रतिनिधी जय महाराष्ट्र म्हटल्यास किंवा राज्य विरोधी घोषणा दिल्यास लोक प्रतिनिधी वर गुन्हा नोंद करत पद रद्द करण्याचे नवीन विधेयक अमलात आणणार असल्याच्या वक्तव्याचा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
सोमवारी दुपारी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली या बैठकीत बेग यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला सीमा भागातील मराठी जनताच या राज्य सरकार च्या कृतीला योग्य ते उत्तर देईल असा मत या बैठकीत मांडण्यात आला . कर्नाटकातील दुष्काळी भागात महाराष्ट्र सरकारचे पाणी चालते इतर मदत चालते मात्र जय महाराष्ट्र चालत नाही याचा विचार महाराष्ट्र सरकारने कावरा आणि कर्नाटकला योग्य तो इशारा द्यावा अशी मागणी देखील करण्यात आली . या बैठकीस मध्यवर्ती कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे ,दिगंबर पाटील राजाभाऊ पाटील , आदी उपस्थित होते .