Friday, December 27, 2024

/

जाणून घ्या बेळगाव

 belgaum

Belgaum killa lakeबेळगावात मराठी लोक बहुसंख्य आहेत. तथापि शहर कर्नाटक मध्ये आहे. बेळगावातील मराठी जनता, कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून त्रासली आहे म्हणणे योग्य आहे.

शहरात मराठी माध्यमाच्या शाळा बहुसंख्य असून महाराष्ट्रा प्रमाणे बरेच जण आपल्या मुलांना इंग्रजि माध्यमातून शिकण्या कडे कल आहे. तथापि, मंडळींनी आपली मराठी अस्मिता जपली आहे

जास्ती लोक शहरातील कामकाज व बाजारपेठांतील व्यवहार याच भाषेत करु इच्छितात. महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करावे.

बेळगाव (Belgaum) हे दक्षिण महाराष्ट्र आणि वायव्य कर्नाटक या सीमाभागात वसलेले एक शहर आहे.बेळगाव शहर हे बेळगाव जिल्हा व बेळगाव विभागाचे प्रशासकीय मुख्यालय आहे.
बेळगाव समुद्रसपाटीपासून २,५०० फूट (७६२ मीटर) उंचीवर वसले आहे. हे शहर मार्कंडेय नदीच्या किनाऱ्यावर आहे. बेळगावचे जगाच्या नकाशावरील स्थान १५°५२’ उत्तर अक्षांश व ७४°३०’ पूर्व रेखांश असे आहे.[२] महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या सीमेलगत पश्चिम घाटात असलेले बेळगाव मुंबईपासून सुमारे ५०० कि.मी. अंतरावर आहे. बेळगाव जिल्ह्यात १,२७८ खेडी असून जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १३,४१५ चौरस कि.मी आहे, तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे. या लोकसंख्येपैकी ३१,९५,००० इतकी लोकसंख्या ग्रामीण भागातील आहे.[३] बेळगावचे वातावरण आल्हाददायक असून येथे मुख्यतः सदाहरित वनस्पती आढळतात. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.

सौंदत्ती येथील रट्टा राज्यकर्त्यांनी बेळगाव शहराची स्थापना इसवी सनाच्या बाराव्या शतकात केली. रट्टा अधिकारी बिचीराजा याने इ.स. १२०४ मध्ये बेळगावचा किल्ला बांधला व कमल बस्ती या सुंदर वास्तूची निर्मिती केली. कमल बस्ती या इमारतीच्या आत छतास सुंदर कमळ आहे व नेमीनाथ तीर्थंकर यांची प्रतिमा आहे. किल्ल्याच्या इतर ठिकाणांचे बांधकाम इ.स. १५१९ सुमाराचे आहे. या किल्ल्यात काही जैन मंदिरे व मारुती मंदिर आहे. चालुक्य शैलीचे स्थापत्य सर्वत्र आढळते.

इ.स. १२१०-१२५० पर्यंत बेळगाव रट्टा राज्याची राजधानी होती. देवगिरीच्या यादवांनी रट्टांना हरवून बेळगाव जिंकले. इ.स. १३०० मध्ये दिल्लीच्या खिल्जी यांनी येथील यादव व होयसोळांना पराभूत केले. इ.स. १३३६ मध्ये विजयनगर राज्यकर्त्यांनी बेळगाव काबीज केले.

इ.स. १४७४ मध्ये बहामनी सेनापती महंमद गवान याने बेळगाव काबीज केले. आदिलशाहने बेळगावच्या किल्ल्यात सुधारणा केल्या. मोगल व मराठे या राज्यकर्त्यांनी बेळगावावर राज्य केले व कालांतराने ब्रिटिशांनी इ.स. १८१८ मध्ये या शहरास आपल्या साम्राज्यात समाविष्ट केले. ब्रिटिशांनी येथे लष्कर छावणी (कँटोन्मेंट बोर्ड) बांधली व मराठा लाइट इन्फंट्रीचे मुख्यालय येथे स्थापन केले.[४]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ३९वे अधिवेशन बेळगावात झाले. अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोव्याजवळ असल्यामुळे ब्रिटिश राजवटीच्या काळी व नंतर स्वातंत्र्योत्तर काळांतदेखील बेळगावचे सैन्याच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व होते. गोवा मुक्तिसंग्रामात गोव्यात भारतीय सैन्य बेळगावातूनच पाठविण्यात आले. स्वातंत्र्यानंतर बेळगाव बॉम्बे राज्यात व १९५६च्या राज्य पुनर्रचनेनंतर म्हैसूर राज्यात (कर्नाटक) गेले. तेव्हापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात बेळगावावरून वाद सुरू आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे
बेळगावाचे प्राचीन संस्कृत नाव वेणुग्राम म्हणजेच बांबूचे खेडे असे होते. इंग्रजीत बेळगावचे स्पेलिंग Belgaum (बेलगाम) असे करतात. त्यामुळे उर्वरित भारतात या शहराला बेलगाम म्हणतात. कर्नाटक सरकारने बेळगावचे ‘बेळगावी’ असे नामांतर केल्याचे जाहीर केले होते परंतु केंद्र सरकारने या नामांतरास नकार दिला आहे.[५] महाराष्ट्र सरकारच्या विरोधामुळे व मराठी जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नामांतरास नकार दिला आहे.[६] इंग्रजी व मराठी प्रसारमाध्यमांत देखील शहराचे कन्नड नाव वापरले जात नाही.[७][८] मराठीत बेळगाव व बेळगाव या दोन्ही प्रकारे शहराचे नाव लिहिले जाते. कर्नाटकातील सरकारी पाट्या-प्रकाशनामध्ये ‘बेळगावी’ असे लिहिले जाते.

बेळगांव हे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरचे मोठे व्यापारकेंद्र आहे. बेळगावात अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्थादेखील आहेत. बेळगावात अनेक मोठे उद्योग आहेत, पैकी इंडल ॲल्युमिनियम उद्योग व पॉलिहायड्रॉन हे सर्वांत महत्त्वाचे आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा- कृषी उत्पन्न, धान्ये, ऊस, तंबाखू, तेलबिया, दुग्धउत्पादने. शहरातील मुख्य उद्योग- चामड्याच्या वस्तू, माती(क्ले), साबण, कापूस, धातू, हायड्रॉलिक. बेळगाव शहर पॉवरलूम उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

बेळगावात भारतीय सैन्य दलाची अनेक सैनिकी शिक्षणकेंद्रे व भारतीय हवाईदलाचे तळ व कमांडो स्कूल आहेत. बेळगावाच्या भौगोलिक स्थानामुळे ब्रिटिशकाळापासूनच शहराचे महत्त्व वाढले होते. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचे मुख्यालय येथेच आहे.
बेळगांव हे पश्चिम घाटाच्या पायथ्यावर असल्यामुळे शहरास थंडगार हवामान व हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे, चर्च शहरभर पसरले आहेत. बेळगाव हे कुंदा या गोड पदार्थासाठी प्रसिद्ध आहे. रट्टा राज्यकर्त्यांनी बांधलेला बाराव्या शतकातील बेळगावचा किल्ला इंडो-सार्केनीक व दख्खनी वास्तुकलेनुसार बांधला गेला आहे. हा किल्ला शहराच्या मध्यवस्तीत आहे व आतमध्ये काही मशिदी व मंदिरे आहेत. चालुक्य वास्तुकलेनुसार बांधलेल्या कमलबस्ती च्या आत नेमीनाथ तीर्थंकराची प्रतिमा आहे व छतास सुंदर कमळाची (मुखमंटप) रचना केली गेली आहे. राकसटोप येथे एक भव्य पाषाण प्रतिमा असून मार्कंडेय नदीवर धरण बांधलेले आहे. बेळगावातील सर्वांत जुने मंदिर कपिलेश्वर येथे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे व यास दक्षिणकाशी असे संबोधले जाते. जांबोटी येथे हिरवेगार पर्वत असून लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.

इतर प्रसिद्ध पर्यटनस्थळे- श्री हरिमंदिर, शिवाजी उद्यान, संभाजी उद्यान, नाथ पै पार्क, वज्रपोहा व गोडचिन्माळकी धबधबा, सेंट मेरी चर्च

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.