Saturday, April 27, 2024

/

मूत्राशयावरील संयम – वाचा डॉ सोनाली सरनोबत यांच्या हेल्थ टिप्स

 belgaum

Dr sonali sarnobatवृद्धत्त्वामुळे नेहमी येणा-या अडचणी अनेक असतात. मुत्राशयाच्या समस्या, दृष्टीमध्ये येणा-या अडचणी, अलझायमर, डिमेंशिया, ह्रदयविकार अशी अनेक उदाहरणे आहेत. सुरवातीला आपण मुत्राशयातील समस्यांबद्दल माहिती घेणार आहोत.

वयोमानामुळे घडत जाणारे बदल
मुत्राशयावर संयम न रहाणे ही फक्त वृद्ध स्त्रीयांमधील व्याधी नसून पुरुषांमधेही दिसून येते. खरे तर ही अडचण कोणत्याही वयात येऊ शकते. परंतु वृद्धत्त्वामधे सर्वात जास्त दिसते. मूळव्याध, बद्धकोष्ठ, काही ठराविक औषधे घ्यावी लागणे, मुत्राशयावर एखादा रोग-संचार (इन्फेक्शन) होणे अशी कारणे सुद्धा मुत्राशयावर संयम न रहाण्यासाठी पुरतात. मुत्रपिंडाचा एखादा स्नायू दुबळा झाला, मुतखडा (किडनी स्टोन) झाला, पार्किन्सन्स किंवा अर्थ्रायटीस सारखा मुत्रपिंडावरचा संयम जाऊ शकणारा आजार झाला तर काही वेळा त्यामुळे आलेली मुत्रपिंडावरची अस्वस्थता ही जास्त कालावधीसाठी टिकून रहाते. वृद्धत्वामधे लघवी करत असताना मुत्राशयातले स्नायू कधी कधी आकुंचित पावतात. त्यमुळे योनीमार्गात जळजळ होऊ शकते. आणि त्याच वेळी मुत्राशयाच्या आजुबाजूचे अवयव शिथील होतात आणि संयम नसताना लघवी होऊ शकते.

मुत्राशयावर ताबा नसलेली अनेक माणसे ह्या व्याधीबद्दल डॉक्टरांशी बोलण्याचे टाळतात. पण खरे तर प्रथम थोडा त्रास होत असेल तरीही डॉक्टरांशी बोलणे अत्यंत जरूरीचे असते. कारण उपचारामुळे मुत्राशयाचा थोडा जरी त्रास असेल तरीही तो आटोक्यात येऊ शकतो. अशावेळी तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर डॉक्टर तुमच्या अनेक चाचण्या घेतील, तुमच्या आरोग्याचा पूर्व इतिहास विचारतील, कौटुंबिक आरोग्याचा इतिहास विचारतील, आणि त्यावरून तुमच्या उपचारांचा निर्णय घेऊन सुरवात करतील. डॉक्टर कदाचित तुमची मल-मूत्र चाचणी, रक्त तपासणीही करायला सांगतील आणि तुमचे मुत्रपिंड कितपत रिकामे होऊ शकते ह्याचीही चाचणी घेतील.

 belgaum

मुत्राशयावर संयम न रहाण्याची अनेक कारणे असू शकतात.
१. तणाव असंयमन
व्यायाम करताना, खोकला येताना, कफ असेल तेव्हा, शिंकताना, जोरात हसताना, एखादी जड वस्तू उचलताना किंवा शरिरावर ताण येणारी कोणतीही हलचाल करताना जेव्हा थोडी लघवी होते, त्याला मुत्राशयाचे तणाव असंयमन म्हणतात. मध्यम वयीन स्त्रीयांमध्येसुद्धा ही व्याधी दिसून येते. बाळंतपण झाल्यावर किंवा मेनॉपॉझ सुरू झाल्यावर स्त्रीयांना ही अडचण येऊ शकते.

२. घाई होणे, आणि ताबा न रहाणे
लघवीसाठी जाताना त्या जागी पोहोचे पर्यन्तसुद्धा काहीजण स्वत:वर ताबा ठेउ शकत नाहीत इतकी त्यांना घाई होते. सुदृढ-निरोगी व्यक्तींमधे सहसा ही अडचण दिसत नाही, परंतु मधुमेह झालेल्या व्यक्ती, स्ट्रोक, अल्झायमर, पार्किन्सन्स ह्या व्याधींसहीत जगणा-या व्यक्तींमधे लघवीवरील ताबा न रहाण्याची अडचण ब-याचदा दिसून येते. ही काहीवेळा ब्लॅडर कॅन्सरची पूर्वसूचनाही असू शकते.

३. अतिप्रवाह असंयमन
मुत्रप्रवाहावर असंयमन होते, जेव्हा थोडी लघवी न होता खूपच जास्त होते. पुरुषांचे प्रोस्टेट जेव्हा वाढते तेव्हा त्यांना अनेकदा ह्या व्याधीला सामोरे जावे लागते. मधूमेह किंवा मणक्याची काही व्याधी ह्यामुळे सुद्धा अतिप्रवाह असंयमनाची अडचण वाढू शकते.

४. सामान्य असंयमन
वृद्ध व्यक्तींमधे मुत्राशयावरील सामान्य असंयमनाची अडचण अनेकदा येते. ही अडचण अशांवर येते, ज्यांचे मुत्राशयावरील संयमन सर्वसामान्य आहे परंतु त्यांना लघवी लागल्यावर इतर काही कारणांमुळे उठायला त्रास होतो, चालायला त्रास होतो, अर्थ्रायटीस, गुडघे दुखी, अशक्तपणा ह्या व्याधींमुळे ही अडचण येऊ शकते. फक्त त्याचे गांभीर्य कितपत आहे आणि ते त्या वृद्ध व्यक्तीने कशा त-हेने घेतले आहे, आणि त्यांची जीवनशैली कशी आहे ह्यावरही ते अवलंबून असते.

५. मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण
आपल्या मुत्राशयाची काहे व्याधी सुरू झाली असेल लघवीवरील नियंत्रण जात असेल तर डॉक्टर आपल्याला ते नियंत्रण कसे ठेवायची ह्याचे प्रशिक्षण देतात. ह्यासाठी खरं तर अनेक मार्ग आहेत, परंतु आपल्या मुत्राशयाची व्याधी नेमकी काय आहे ह्यावर सुद्धा ते प्रशिक्षण अवलंबून असते. आणि प्रशिक्षण आत्मसात केल्यास आपण योग्य असे नियंत्रण मुत्राशयावर ठेऊ शकतो.

६. पेल्विक स्नायूंचा व्यायाम
पेल्विक स्नायूंच्या व्यायामाला केगल व्यायाम असेही म्हणतात. हा व्यायाम आपले मुत्राशयाजवळचे काही स्नायू बळकट करण्यासाठी उपयोगी ठरतो. हा स्नायू बळकट झाल्याने वृद्ध व्यक्तींना लघवीवर संयम राखणे सोपे जाते. तसे पहाता हे व्यायाम खूप सोपे आहेत. त्यामुळे आपला ताणही हलका होतो.

बायोफीडबॅक
तुमच्या शरिराकडून येणारे संदेश ओळखण्यासाठी बायोफीडबॅकची मदत होते. त्यामुळे मुत्राशयाजवळच्या स्नायूंवर संयम आणण्यासाठी सुद्धा मदत होते. पेल्विक स्नायूंचा व्यायामासाठी सुद्धा बायोफीडबॅकचा उपयोग केला जातो.

मुत्राशयावरील नियंत्रणाचे प्रशिक्षण हा एकच मार्ग नसून इतरही अनेक मार्ग आहेत. काहीजणांना असंयमनावर नियंत्रण आणण्यासाठी डॉक्टर औषधे देतात. त्या औषधांनी नुसते नियंत्रणच येते असे नाही, तर स्नायू बळकट होतात, मुत्राशय पूर्ण रिकामे व्हायला मदत होते. परंतु ह्या औषधांचे काहीवेळा दुष्परिणामही दिसून येतात. तोंड कोरडे पडणे, डोळे कोरडे पडणे इत्यादी.

उपचार—
होमिओपॅथीमधे यावर अनेक औषधे उपलब्ध आहेत
ऊदा:
१. सरसापरिला
२.सबाडिला
३. लायकोपोडीयम ई.
व्यवस्थीत उपचार घेतल्याने हा विकार पूर्ण बरा होतो.

डाॅ.सोनाली सरनोबत
लेखिका होमिओपॅथिक तज्ञ आहेत.

सरनोबतस् मल्टीस्पेशालीटी होमिओपॅथी
अमर एंपायर
गोवावेस बेळगाव
09916106896
09964946918

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.