Friday, April 19, 2024

/

 आजी माजी भाजप अध्यक्षांत जुंपली

 belgaum

Bjp core commitee
विधानसभा निवडणूक जवळ आली असता सर्व पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहेत बेळगाव भाजप देखील यात मागे नाही.मंगळवारी सकाळी बेळगावात आयोजित कोर कमिटी बैठक झाल्यावर भाजप जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हरकुनी आणि माजी भाजप अध्यक्षा उजवला बडवानाचे यांच्यात जोरदार वाद झाला.

सध्या राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य असलेल्या उजवला बडवानाचे यांनी आपणास बी एस येदुराप्पांच्या कोर कमिटी बैठकीला का बोलवला नाही असा आरोप करत वाद सुरू केला.भाजप चे सर्व नेते आणि पत्रकारा समोर अध्यक्ष उजवला बडवाणाचे यांनी भांडण करून वाद घातल्याने बेळगाव भाजप मध्येही दोन गट आहेत भाजप मध्ये सर्व काही अलबेल नाही हे सिद्ध झाले आहे.

बेळगाव महानगर ,ग्रामीण आणि चिकोडी कोर कमिटी बैठकीच आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीस अनेक भाजप नेत्यांना आमंत्रण न दिल्याचा ठपका हरकुनी यांच्यावर ठेवत बडवानाचे यांनी पक्ष श्रेष्ठी समोर भांडण करतेवेळी काही भाजप नेत्यांनी पत्रकारांना छायाचित्रे घेण्यास मज्जाव करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला तरी देखील भाजप मधील मतभेद चव्हाट्यावर आलेच.

 belgaum

पक्ष संघटना वाढवा-येदूरप्पा
माजी मंत्री भालचंद्र जारकीहोळी बैठकीस का उपस्थित राहिले नाहीत हे मला ठाऊक नाही अस मत प्रदेशाध्यक्ष बी एस येदूरप्पा यांनी व्यक्त केलं. पक्ष संघटना मजबूत करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं.

केंद्रीय समिती तिकीट वाटप करणार
आगामी विधान सभेची तिकीट वाटप पक्ष अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय समिती जाहीर करणार असल्याचे येदुराप्पां यांनी स्पष्ट केलं असलं तरी राज्य सभा खासदार प्रभाकर कोरे यांच्या घरी उत्तर दक्षिण आणि ग्रामीण मतदार संघात कुणाला उमेदवारी ध्यावी याची चर्चा स्थानिक नेत्यां सोबत केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.