लोकमान्य*तर्फे शुक्रवारपासून भरगच्च कार्यक्रम

0
 belgaum

-लोकमान्य सोसायटीला नागरिकांच्या प्रचंड सहकार्यातून यशस्वी २२ व्या वर्षात पदार्पण आणि जनमासात विश्वास संपादन केल्याने जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तीन दिवसीय कार्यक्रमात गोवा शिमगोत्सवाचे महत्व तसेच इतर लोककलांचे आयोजन ७/८/९ एप्रिल रोजी जैतनमाळ संकल्पभूमीत हा भव्य कार्यक्रम होणार आहे.
दि ७ रोजी लोकमान्य सोसायटीला ग्राहकांनी सक्षम प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांच्याशी चर्चा,हितगूज तसेच यापूढेही यशस्वीतेसाठी मोलाचे सहकार्य लाभण्यासाठी ग्राहकांशी संवाद मेळावा.
दि ८ रोजी महिला मेळावा-महिला वर्ग अर्थार्जन,उद्दोगाकडे वळत आपली आपल्या कुटुंबात व समाजात सुद्धा मानाने वावरण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढत ठेवण्यासाठी कोणते उपाय केल्यास सक्षमपणा निर्माण होईल यासाठी संध्याकाळी ५ वाजता संकल्पभूमीत तज्ञांतर्फे मार्गदर्शन व थेट संवाद साधत हितगूज साधण्याच्या कार्यक्रमात बहुसंख्य महिलांनी जाणिवपूर्वक उपस्थित रहाव अशी विनंती आहे.
दि ९ रोजी गोव्यातील कष्टकरी जनतेच्या संस्कृती व कलेचे दर्शन घडवत शिमगोत्सव मिरवणूक बेळगावकरांना मनसोक्त अनुभवता येणार आहे.तेंव्हा लोकमान्य सोसायटी व ज्ञानदिप गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने अडीच हजाराहून जास्त कलाकार सहभागी होत हा शिमगोत्सव साजरा करण्यासाठी लोककला सादर करत चित्ररथ हे खास वैशिष्ट्य जनतेच्या डोळ्यांचे पारणे फेडणार आहे तेंव्हा बेळगावमधील संध्याकाळी ५.३० च्या कार्यक्रमात तसेच जैतनमाळमधील ७/८/९ एप्रिलच्या भरगच्च कार्यक्रमात उपस्थित राहून त्याच ठिकाणी या कार्यक्रमात मोठी बक्षिसेही दिली जात उत्तमोत्तम लोककला सादर करणार्यांचा आनंद द्विगूनित होणार आहे.असे लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तसेच ज्ञानदिप चे अध्यक्ष किरण ठाकूर व सर्व सदस्य मंडळींतर्फे संपूर्ण कार्यक्रमास आग्रहपूर्वक उपस्थित राहून आनंद उपभोगावा असे आवाहन आणि विनंती केली आहे.

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.