Saturday, April 20, 2024

/

दीड कोटींच्या दोन हजारांच्या नोटा आणि साड़े 8 किलो सोन जप्त

 belgaum

Gold curency

पाणी पोलिसांनी विनापरवाणा सोन्याची तस्‍करी करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला मुद्देमालासह ताब्‍यात घेतले आहे.   पोलिसांनी त्‍यांच्याकडून साडेआठ किलो सोन्यासह  दीड कोटी रूपयांची रोख रक्‍कम जप्त केली आहे. एकूण चार कोटी १५ लाख एक हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.  श्रीपाल चंपालाल चव्हाण, रणजितसिंग किमसिंग रजपूत, कांतीलाल सूनिलाल कुमारवना, दर्शित ललित परमार (चौघेही रा. मुंबई), हर्षा श्रीपाल पोरवाल आणि प्रविण बनसिलाल पोरवाल (दोघेही रा. बेळगाव) अशी पोलिसांनी ताब्‍यात घेतलेल्‍यांची नावे आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ही टोळी गेल्‍या काही दिवसांपासून सोने तस्‍करी करत आहे. निपाणी, गोकाक आणि इचलकरंजी येथील सराफांना ते सोने पुरवत होते. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास ही टोळी सोन्याची तस्‍करी करण्यासाठी मुंबईहून बेळगाकडे निघाली असताना, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हादृीतील मांगुर फाटा येथे निपाणी पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले. त्‍यांच्याकडून साडे आठ किलो सोने  (किंमत, दोन कोटी, ५४ लाख, १६ हजार),रोख  एक कोटी ५७ लाख ४८ हजार, एक स्‍विप्ट कार,  आणि ७० हजार रूपयांच्या मोबाईलसह एकूण चार कोटी १५ लाख एक हजार शंभर रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई, निपाणीचे एपीआय किशोर भरणी, फौजदार निंगनगौड पाटील, यांच्यासह विशेष पथकाने केली. या कारवाईबदृल जिल्‍हा पोलिस प्रमुख डॉ. बी. आर. रविकांते गौडा व उपाधिक्षक बी. एस. आंगडी यांनी निपाणी पोलिसांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.