Friday, April 26, 2024

/

बैलूर च्या जवानास श्रीनगर मध्ये वीरमरण

 belgaum

Crpf jawan

खानापूर तालुक्यातील कित्तूर जवळील बैलूर गावचा सुपुत्रास श्रीनगर मध्ये हुतात्म्य पत्कराव लागलं आहे.बसप्पा बजंत्री असं या जवानाचे नाव असून सी आर पी एफ मध्ये जम्मू काश्मीर मध्ये कार्यरत होता.
बसप्पा आपल्या सहकार्या सोबत ट्रक मधून श्रीनगर हुन जम्मू कडे परतत असतेवेळी दशहत वाद्यांनी केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झाला आहे. श्रीनगर मध्ये होत असलेल्या पोट निवडणुकीतील बंदोबस्त ठिकाणी त्याला तैनात करण्यात आले होते दशहत वाद्यांनी केलेल्या खुल्या फायरिंग मध्ये आणखी सहा जण जखमी तर बसप्पा ला वीर मरण प्राप्त झाले आहे. गेली 16 वर्ष तो सी आर पी एफ मध्ये सेवा बजावत होता .बैलूर या त्याच्या गावी ही बातमी स्मजल्यावर गावावर शोक कळा पसरली होती. बैलूर मध्ये शासकीय इतमामात मंगळवारी उशिराअंतिम संस्कार केले जाणार असून त्याच पार्थिव दिल्ली गोवा मार्गे बैलूर ला आणलं जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.