सीमा प्रश्नी कर्नाटकाला सरीन कमिटी समोर साक्ष देण्याची गरज नाही-एच के पाटील

0
 belgaum

बेळगाव Hk patilकर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी सुप्रीम कोर्टात कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्या कर्नाटकाची बाजु मजबूत आहे असा दावा कर्नाटकाचे ग्रामीण विकास मंत्री सीमा प्रश्नाचे समन्वयक मंत्री एच के पाटील यांनी केला आहे.
एका दिवसाच्या बेळगाव दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.

सीमा प्रश्नी कर्नाटकचा समन्वयक मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्या वर बेळगाव कर्नाटकाच म्हणुन न्या मनमोहन सरीन समिती समोर साक्ष देणे अनिवार्य होते प्रश्न राज्याच्या अस्मितेचा असल्यानं आता परिस्थितीत खूप बदल झालाय. सीमा प्रश्नी चर्चा आणि निर्णय हा पूर्णपणे संसदेच्या कक्षेत येणारा विषय आहे बेळगाव प्रश्नी मी खूप ऍक्टिव्ह आणि सिरीयस आहे त्यामुळे कर्नाटका ला नैतिक बळ मिळालं आहे.

bg

सीमा प्रश्न संसदेच्या कक्षेतील विषय आहे सुप्रीम कोर्टाच्या अखतीयारीतील नव्हे असं अनेकदा सुप्रीम कोर्टात कर्नाटकाने बाजू मांडली आहे यामुळे महाराष्ट्राच्या मागणी नुसार नेमलेल्या सरीन कमिटी समोर साक्षी देण्याची कर्नाटकाला गरज नाही असं पाटील म्हणाले.

या प्रश्ना वर आमचे सगळे प्रयत्न सुरू असून बेळगावातील स्थानिक कन्नड नेत्या बरोबर मी कायम संपर्कात असून यावर वरचे वर चर्चा होत असते .

सुप्रीम कोर्टात कर्नाटकावरील धोक्याचं सावट दूर झालं असून आम्हाला कायदेशीर नैतिक बळ आहे सरीन समिती समोर बेळगाव सह इतर गावं आमचीच आहे अशी साक्ष सांगायची भीती तेंव्हा होती आता नाही असं ते म्हणाले

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.