बेळगाव दि 12- शांताई विद्या आधार योजनेंतर्गत रविवारी तीन विध्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली. जोयडा जिल्हा पंचायतीचे सदस्य रमेश नाईक यांच्याहस्ते हि मदत देण्यात आली आहे.
प्रत्येकी ३ हजार प्रमाणे बेनन स्मिथ हायस्कुल मधील दोन आणि जोशी पब्लिक स्कूल मधील एक विद्यार्थ्यास ४५०० रुपये अशी मदत देण्यात आली आहे.
संस्थेचे कार्याध्यक्ष विजय मोरे, माजी नगरसेवक दीपक वाघेला, डी बी पाटील आणि अभिजीत भातकांडे आदी उपस्थित होते.
या योजनेस नागरिकांनी जास्तीत जास्त रद्दी देऊन सहकार्य करावे, अधिक माहितीसाठी ९८४४२६८६८७ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.