Thursday, April 25, 2024

/

तहान भागवण्याची प्यास बाळगणारे फौंडेशन

 belgaum

बेळगाव दि ६ :बेळगावचे प्रसिद्ध डॉक्टर माधव प्रभू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून बनविलेल्या प्यास फाऊंडेशनने सुळगा (येळ्ळूर) गावातील तलावाचे केवळ २० दिवसांत पुनरुज्जीवन केले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती निवा रून अनेकांची तहान भागवण्याची प्यास बाळगणारे असे हे फौंडेशन एक विधायक काम करीत असून त्यांचा आदर्श इतरांनाही घेण्यासारखा आहे.

सोमवारी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी जयराम यांच्या उपस्थितीत या पुनरुज्जीवित तलावाचे लोकार्पण करण्यात आले. मागील तीन ते चार आठवड्यापासून प्यास चे कार्यकर्ते या उदात्त कार्यासाठी झटत होते, पावसाळ्याच्या पूर्वी मातीत गाडले गेलेले तलाव पुन्हा पूर्वपदावर आणण्याचा विडा उचलण्यात आला आहे. हा उपक्रम अनेकांसाठी तसेच विशेषतः शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे.

डॉ माधव प्रभू हे माजी नगरसेविका आणि सामाजिक कार्यकर्त्या लालन प्रभू यांचे चिरंजीव आहेत. सामाजिक कार्याचे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासून झाले आहेत. केएलई इस्पितळात ते सेवा बजावतात. त्यांच्या हातून अशी मोठी कामे घडत राहोत या बेळगाव live च्या वतीने शुभेच्छाpyas fundeshan 2

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.