Thursday, April 25, 2024

/

बेळगावात हुकमशाही नांदते काय ? अभिनेत्री शर्मीष्ठा राऊत

 belgaum

बेळगाव दि १२ : केवळ “बेळगाव महाराष्ट्राचा” असा उल्लेख असलेला  असा टी शर्ट विकणाऱ्या वर कारवाई होते याचा अर्थ बेळगावात हुकुमशाही नांदते काय ? असा प्रश्न मराठी अभिनेत्री शर्मीष्ठा राऊत हिने केला आहे. बेळगावातील येळ्ळूर साहित्य संमेलनात सहभागी होण्यासाठी आली असता स्थानिक वृत्त वाहिनीच्या निवेदिका ने बेळगाव बद्दल  विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होती .

बेळगाव मधल्या अलीकडच्या गोष्टी पहिल्या की सीमा भागातील लोक भारत पाक सीमेवर आहे का असा सुद्धा प्रश्न मला पडला अस म्हणत येळ्ळूर गावाचा महाराष्ट्र राज्य फलक मी महाराष्ट्र टाईम्स मध्ये वाचला होता.  गुडी पाडव्या दिवशी प्रत्येक येळ्ळूरकर मराठी भाषिकाने आपल्या घरावर भगव्या रंगाची गुडी उभारावी जेणे करून हा एक चळवळीचा भाग असेल या वनवासातून मुक्त होण्यासाठी गुडीच्या माध्यमातून देखील चळवळ सुरूच राहील असा सल्ला देखील राऊत ने यावेळी दिला . साहित्य  संमेलनात सहभागी होण्यासाठी आली असता ग्रामीण साहित्य संघाच्या वतीने राऊत यांना महाराष्ट्र राज्य येळ्ळूर हा फलक भेट देण्यात आला actress sarmistha raut

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.