Sunday, April 21, 2024

/

भाषा हे अभिव्यक्तीचे माध्यम- येळ्ळूर संमेलनात श्रीपाद जोशी याचं मत

 belgaum

बेळगाव दि १२ : भाषा हे साहित्याचे नव्हे तर अभिव्यक्तीचे माध्यम आहे.त्यामुळे  भाषा घडायला हवी अस मत अखिल भारतीय मराठी साहित्य महा मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केल .

बेळगावातील येळ्ळूर येथील ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित १२ मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केले . यावेळी  हैद्राबाद आय पी एस अधिकारी महेश भागवत या साहित्य संमेलनाच उद्घाटन केल तर प्रमुख पाहुणे म्हणून महपौर सरिता पाटील उपस्थित होत्या . राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक अरुण सूळगेकर हे या येळ्ळूर संमेलनाच स्वागताध्यक्ष होते.

जोशी पुढे म्हणाले की राजद्रोहाचे कलम घटनेतून हद्दपार व्हायला हवे. आज विकासाची व्याख्या बदलत आहे. अधिग्रहित जमिनी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जात आहेत. अशावेळी विरोध करणारे मेधा पाटकरांसारखे कार्यकर्ते राजद्रोहाच्या कलमात अडकत असून हे कलम हटविण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. येळ्ळूर हे संघर्षाचे गाव आहे. आजवर तुम्ही तीन पिढ्यांचा जो संघर्ष करीत आहात तो अवर्णनीय आहे. आम्ही तुमचे आदर्श नव्हे तर तुम्ही आमचे आदर्श आहात.

असे झाले संमेलनात ठराव

तीन सत्रात हे सम्मेलन पार पडल या साहित्य संमेलनावर देखील १६ फेब्रुवारी  रोजी होणार्या क्रांती मोर्चाची छाप पडली होती . मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात असा ठराव या संमेलनाद्वारे मांडण्यात आला . सीमा भागातील मराठी भाषिकांना मराठीतून परी पत्रिके द्यावीत . महाराष्ट्र सरकारने बेळगावातील मराठी संवर्धन करणाऱ्या साहित्य संमेलनांना अनुदान ध्यावे आणि कै दाबोलकर पानसरे कलबुर्गी यांच्या मारेकार्याना शिक्षा व्हावी .

मन उधाण वाऱ्याचे  आणि उंच माझा झोका मालिका फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत येळ्ळूर मराठी साहित्य संमेलनात सहभागी  झाली होतीyellur sammlen meeting

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.