belgaum

आनंदाचा दिवस ठरला काळरात्र!बेळगावमध्ये चौघांचा जळून मृत्यू

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : घराघरांत गणरायाच्या आगमनाचा उत्साह… परिसरात भक्तिमय वातावरण… पण याच गणेश चतुर्थीच्या दिवशी बेळगावच्या चव्हाट गल्लीतील एका कुटुंबावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला.

मध्यरात्री घरातून अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर पडल्या… काही क्षणांतच संपूर्ण घर आगीने वेढून गेले. घरातील व्यक्तींना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला.

शारदा दमोने (45) आणि भारती दमोने (50) प्रिया दमोने (28) आणि गंगा दमोने (25)यांचा या आगीत दुर्दैवी अंत झाला.

 belgaum

घरातील फ्रिजचा स्फोट झाल्यानंतर आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे अशी शक्यता देखील व्यक्त केली आहे मात्र, आगीने इतका वेगाने रौद्ररूप धारण केले की, काही कळण्याच्या आतच घरातील संसार जळून खाक झाला.

या दुर्घटनेत गजानन दमोने (65), रोशन दमोने (21), या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या परिवारासाठी गणेश चतुर्थीचा दिवस आयुष्यभर न विसरता येणाऱ्या दुःखद आठवणीत बदलला आहे.

ज्या दिवशी घरात गणरायाच्या आगमनाचा आनंद असायला हवा होता, त्याच दिवशी चार जणांचे मृतदेह बाहेर काढावे लागले…

या घटनेने चव्हाट गल्लीसह संपूर्ण परिसर सुन्न झाला असून, दमोने कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण गहिवरून गेले आहे.

ही हृदयद्रावक घटना मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, आगीचे नेमके कारण आणि दुर्घटनेबाबतचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.