belgaum

माजी जवानांच्या सरकारकडे ५ मोठ्या मागण्या!

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा माजी CAPF वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवारी बेळगावमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील जवानांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

BSFचे निवृत्त DIG आणि बेळगाव जिल्हा CAPF संघटनेचे मानद अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत माजी जवानांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. सुमारे दोन ते तीन तास झालेल्या चर्चेत केंद्र आणि राज्य सरकारकडे मांडावयाच्या विविध मागण्या निश्चित करण्यात आल्या.

माजी CAPF जवानांसाठी OROP अर्थात ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करावी, तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. याशिवाय राज्य सरकारच्या कॅन्टीन सवलतीमध्ये ५० टक्के रिबेटचा लाभ मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.

 belgaum

माजी सैनिकांना जमीन किंवा भूखंड वाटप, तसेच हाऊस प्रॉपर्टी टॅक्समध्ये ५० टक्के सवलत सर्व ठिकाणी लागू करावी, याबाबतही बैठकीत चर्चा झाली. निवृत्त होणाऱ्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या माजी CAPF जवानांच्या कुटुंबीयांना शासनाकडून उपलब्ध सर्व सुविधा मिळाव्यात, अशी मागणीही संघटनेने केली.

या सर्व मागण्या केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठवण्यात येणार असून, स्थानिक खासदार, मंत्री आणि लोकप्रतिनिधींच्या माध्यमातूनही हे प्रश्न सरकारसमोर मांडले जाणार आहेत. माजी CAPF जवानांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाने सकारात्मक सहकार्य करावे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.