belgaum

शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसेंची बदली ; प्रकाश निकम नवे पोलीस आयुक्त

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची हुबळी धारवाड येथे अचानक बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी २०१२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांची नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी भूषण बोरसे यांची राज्य शासनाने अचानक बदली केली असून त्यांची हुबळी धारवाडच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाचे उपसचिव संजय बी. एस. यांनी जारी केलेल्या आदेशानुसार २००९ च्या तुकडीचे डीआयजी दर्जाचे अधिकारी भूषण बोरसे यांच्याकडे हुबळी धारवाड पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी तात्काळ सोपवण्यात आली असून हुबळी धारवाडचे तत्कालीन आयुक्त एन. शशी कुमार यांची अन्यत्र नियुक्ती करण्यात आली आहे.

भूषण बोरसे यांनी बेळगावमधील आपल्या कार्यकाळात भाषिक, जातीय आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. अत्यंत संवेदनशील असलेल्या बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात ठेवून त्यांनी बेळगावच्या जनतेचा विश्वास संपादित केला होता. त्यामुळे त्यांच्या तडकाफडकी बदलीमुळे प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

 belgaum

बेळगाव शहरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सलग बदल्यांचे सत्र गेल्या काही काळापासून पाहायला मिळत आहे. यापूर्वी पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले याडा मार्टिन मारबानियांग यांची देखील पिरनवाडीतील एका घटनेनंतर अशीच अचानक बदली करण्यात आली होती. त्यानंतर भूषण बोरसे यांनी बेळगावची सूत्रे हाती घेतली होती.

२०१२ च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी प्रकाश निकम यांची बेळगावचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे. प्रकाश निकम हे २०१२ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी असून त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीला बेळगाव ग्रामीण भागात प्रोबेशनरी आयपीएस अधिकारी म्हणून काम केले आहे. बेळगावच्या भौगोलिक आणि सामाजिक वातावरणाची पूर्वमाहिती असल्याने त्यांच्या या अनुभवाचा फायदा शहराच्या कायदा व सुव्यवस्थेसाठी होणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.