belgaum

PMFME मध्ये बेळगावची बाजी; १,२७९ उद्योजकांना ९७ कोटींचे कर्ज

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे औपचारिकीकरण (PMFME) योजनेच्या अंमलबजावणीत बेळगाव जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत नवी दिल्ली येथे आयोजित PMFME Conclave मध्ये बेळगावचे संयुक्त कृषी संचालक यांचा केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

PMFME योजनेला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय अन्नप्रक्रिया मंत्रालयाच्या वतीने २४ व २५ ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे PMFME Conclave आयोजित करण्यात आले होते. यामध्ये योजनेची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये आणि जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

बेळगाव जिल्ह्यात PMFME योजनेअंतर्गत आतापर्यंत १,२७९ सूक्ष्म उद्योजकांना ९७.१४ कोटी रुपयांचे बँक कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यापैकी ३६.६१ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांना आर्थिक पाठबळ मिळाल्याने अनेक उद्योजकांना आपले व्यवसाय उभारण्यास आणि विस्तारण्यास मदत झाली आहे.

 belgaum

जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्यामुळे कृषी विभागाने विविध बँकांच्या समन्वयातून अधिकाधिक सूक्ष्म उद्योजकांची निवड करून त्यांना PMFME योजनेचा लाभ मिळवून दिला. यामुळे बेळगाव जिल्ह्याने या योजनेच्या अंमलबजावणीत राज्यात उल्लेखनीय स्थान मिळवले आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेळगावचे संयुक्त कृषी संचालक यांचा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.