belgaum

शेळी चोरीचा पर्दाफाश; सात शेळ्यांसह दोघे जेरबंद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी शेळ्या चोरी करणाऱ्या दोघांना यमकनमर्डी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 1.50 लाखांहून अधिक किमतीच्या सात शेळ्या व बोकड, तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारी कार आणि रेकी करण्यासाठी वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

यमकनमर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील होसूर, हुक्केरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुनवाड आणि अंकलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंदर्गी येथे शेळ्या चोरीच्या घटना घडल्या होत्या.

या प्रकरणी गोकाक तालुक्यातील अंकलगी येथील लक्ष्मण कणबरगी (30) आणि हुक्केरी तालुक्यातील बन्नीबागी येथील सिद्दप्पा नाईक (27) यांना पोलिसांनी अटक केली.

 belgaum

वाहन तपासणीदरम्यान संशयास्पदरीत्या आलेली कार पोलिसांनी अडवून तपासली. यावेळी दोघे पोलिसांच्या हाती लागले. त्यांची चौकशी केली असता जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या शेळ्या चोरीच्या घटनांची माहिती समोर आली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात येणारी मारुती सुझुकी 800 कार आणि दिवसा चोरीच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी वापरण्यात येणारी दुचाकी जप्त केली आहे.

यमकनमर्डीचे सीपीआय जावेद मुशापुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय बी. के. पाटील आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. यमकनमर्डी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.