belgaum

ज्येष्ठांच्या सहवासात जागतिक छायाचित्रण दिन

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि तालुका फोटो व व्हिडिओ ग्राफर संघटनेच्या (BCTPA) वतीने ‘जागतिक छायाचित्रण दिन’ यंदा सामाजिक बांधिलकी जपत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. बेळगाव येथील शांताई वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

छायाचित्रकार हा केवळ सुंदर क्षण टिपणारा कलाकार नसून समाजाशी जोडलेला संवेदनशील घटक आहे, या भावनेतून संघटनेने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांच्या सहवासात जागतिक छायाचित्रण दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी मोठ्या संख्येने छायाचित्रकार तसेच वृद्धाश्रमातील आजी-आजोबा उपस्थित होते.

कार्यक्रमात छायाचित्रण क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व असलेले सन्नी कलर लॅब अँड लॅमिनेशनचे संचालक विजय मारुती भातकांडे यांचा छायाचित्रण क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. तसेच शांताई वृद्धाश्रमातील मारिया विजय मोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

 belgaum

यावेळी BCTPA चे अध्यक्ष डी. बी. पाटील, सचिव संजय हिशोबकर यांच्यासह संतोष पाटील, दीपक वांद्रे, नितीन महाले, भरमा मोटरे, सचिन गोविलकर, धोंडिबा दिवठे, बाळू सांगुकर, नामदेव कोळेकर, कृष्णा मलाई, अनिल बर्गे, संदीप पाटील आणि प्रतीक नाईक उपस्थित होते.

यावेळी बोलताना संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि अनुभव पाठीशी असणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. भविष्यातही BCTPA छायाचित्रकारांच्या हितासोबतच सामाजिक भान जपणारे विविध उपक्रम राबवत राहील.”

जागतिक छायाचित्रण दिनाच्या निमित्ताने छायाचित्रकारांनी वृद्धाश्रमातील ज्येष्ठांशी संवाद साधत त्यांच्यासोबत वेळ घालवला. सामाजिक बांधिलकी जपत साजरा झालेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.