belgaum

रौडीवर ५ जिल्ह्यांत १४८ प्रतिबंधात्मक कारवाया

0
SP RAMRAJAN
 belgaum

बेळगाव लाईव्ह : उत्तर कर्नाटकातील रौडींच्या हालचालींना आळा घालण्यासाठी पोलिसांनी जुलै महिन्यात विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. बेळगाव, विजयपूर, बागलकोट, धारवाड आणि गदग या पाच जिल्ह्यांत पोलिसांनी रौडींच्या हालचालींवर नजर ठेवत विविध कायदेशीर कारवाया केल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या मोहिमेत एकूण ५३ रौडी निवारण पथके सक्रिय करण्यात आली होती. पोलीस ठाणे आणि पोलीस वर्तुळ कार्यालयाच्या स्तरावर ही पथके काम करत आहेत.

१४८ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

रौडींच्या हालचाली रोखण्यासाठी बीएनएसएस कलम १२६, १२७, १२८ आणि १२९ अंतर्गत एकूण १४८ प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

 belgaum
  • बेळगाव – ३२
  • विजयपूर – ७०
  • बागलकोट – २०
  • धारवाड – २
  • गदग – २४

यामध्ये विजयपूर जिल्ह्यात सर्वाधिक ७० जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

२३ रौडींना हद्दपारीचा दणका

गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असलेल्या रौडींविरोधात कर्नाटक पोलीस कायद्यानुसार हद्दपारीची कारवाई करण्यात आली. एकूण २३ रौडींविरोधात हद्दपारीचे आदेश काढण्यात आले.

यामध्ये विजयपूर १, बागलकोट १०, धारवाड २ आणि गदग १० जणांचा समावेश आहे.

६ जणांवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी गुंडा कायद्याचाही वापर करण्यात आला. बेळगाव, विजयपूर आणि बागलकोट जिल्ह्यात प्रत्येकी दोन, अशा एकूण सहा जणांवर गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

बेळगावमध्ये ५ आरोपींवर ‘कोका’

संघटित गुन्हेगारीविरोधातही पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. हारूगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गुन्ह्यात सहभागी पाच आरोपींवर कोका कायदा लागू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

५ जिल्हे | ५३ पथके | १४८ कारवाया | २३ हद्दपार

रौडींच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या विशेष मोहिमेमुळे गुन्हेगारी प्रवृत्तींवर पोलिसांचा वचक निर्माण करण्याचा प्रयत्न स्पष्ट झाला आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक रामराजन यांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.