belgaum

चॉकलेटच्या नावाखाली अमली पदार्थांचा धंदा;

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : चॉकलेटच्या पाकिटांमध्ये गांजा मिश्रित अमली पदार्थ… आणि हे पदार्थ कॉलेज परिसराच्या अगदी जवळ विक्रीसाठी! बेळगावच्या उद्यंबाग परिसरात समोर आलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.

के.एल.ई. इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील सार्वजनिक रस्त्यालगत गांजा मिश्रित अमली पदार्थांची चॉकलेट पाकिटे विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर उद्यंबाग पोलिसांनी कारवाई केली. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.

भोलू पिता जित्ताल प्रजापती (वय ३९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो हनुमान नगर, बेळगाव येथे राहत असून मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 belgaum

कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत असल्याचे समोर आल्याने तरुण पिढीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई जाऊ नये, यासाठी पोलिसांची सतर्कता आणि पालकांसह समाजाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.

खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश व्ही. होसपेटी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.