belgaum

या मंदिरात तोडफोड; खानापूर तालुक्यात संताप

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: खानापूर तालुक्यातील निडगल गावचे ग्रामदैवत आणि ‘सिद्धगुंढा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक मंदिरात अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केल्याची घटना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. मंदिरातील शिवलिंग, नंदी, कासव आणि तुळशी वृंदावनाची नासधूस करण्यात आली आहे.

घटनेमुळे निडगलसह परिसरातील ग्रामस्थ आणि शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरात भाविकांची गर्दी वाढणार असतानाच हा प्रकार घडल्याने धार्मिक स्थळाच्या सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित झाला आहे.

या तोडफोडीमागे नेमका कोणाचा हात आहे, तसेच धार्मिक तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे का, याचा तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 belgaum

घटनेनंतर निडगल ग्रामस्थांनी खानापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलीस स्थानकाचे पीआय एल. एच. गोवंडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून, तोडफोड करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दोषींना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ व भाविकांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.