belgaum

एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांचा हिशोब द्यावाच लागेल: डॉ. सोनाली सरनोबत

0
DR sonali sarnobat
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमाती विकास महामंडळातील निधीच्या कथित गैरव्यवहार आणि मनी लाँडरिंग प्रकरणामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, या प्रकरणातील एक-एक रुपयाचा हिशोब सरकारला द्यावाच लागेल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी दिला आहे.

या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्यावर कारवाई केली असून महामंडळाचा सुमारे ८९.६२ कोटी रुपयांचा निधी बेकायदेशीरपणे वळवल्याचा आरोप केला आहे. तसेच नागेंद्र यांच्याशी संबंधित ८.०७ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयनेही याप्रकरणी आरोपपत्र दाखल केले आहे.

हा निधी अनुसूचित जमातीतील गरीब कुटुंबांच्या शिक्षण, रोजगार आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी राखीव होता. त्यामुळे या पैशांचा गैरवापर होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे डॉ. सरनोबत यांनी म्हटले आहे.

 belgaum

कथित गैरव्यवहारातील संपूर्ण रक्कम शोधून काढून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि तपासात पारदर्शकता आणावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नागेंद्र यांनी सर्व आरोप नाकारले असले, तरी तपास यंत्रणांनी केलेल्या गंभीर आरोपांबाबत त्यांनी जनतेसमोर उत्तर दिले पाहिजे, असे स्पष्ट करत एसटी समाजाच्या हक्काच्या पैशांच्या संरक्षणासाठी भाजपचा संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.