belgaum

BSNL नेटवर्क समस्येवर तोडगा काढण्याची मागणी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील विविध भागांमध्ये भेडसावत असलेल्या BSNL मोबाईल नेटवर्कच्या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनने खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे केली आहे.

असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील आणि सचिव कमरुद्दीन सौदागर तसेच संजय पाटील यांनी 31 ऑगस्ट रोजी खासदार जगदीश शेट्टर यांच्याकडे यासंदर्भातील निवेदन सादर केले. शहरातील फोर्ट रोड, जिल्हाधिकारी कार्यालय व न्यायालय परिसर, गोवावेस कॉर्पोरेशन कॉम्प्लेक्स, बेळगाव महापालिका कार्यालय परिसरासह अनेक ठिकाणी BSNLचे ग्राहक असूनही पुरेसे मोबाईल नेटवर्क उपलब्ध होत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून BSNLची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना नेटवर्कच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, याबाबत BSNLच्या सहाय्यक महाव्यवस्थापकांकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्याचे असोसिएशनने सांगितले. बेळगाव शहरात BSNLचे पुरेसे टॉवर नसल्यामुळे नेटवर्कची समस्या निर्माण होत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

त्यामुळे शहरातील विविध भागांत आवश्यकतेनुसार नवीन नेटवर्क टॉवर उभारून BSNLची सेवा सक्षम करावी, अशी मागणी खासदारांकडे करण्यात आली.

 belgaum

यासोबतच आकाशवाणीच्या रेडिओ सिग्नलमध्येही सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली. बेळगाव शहरात आकाशवाणीचे सिग्नल स्पष्टपणे मिळत नसल्यामुळे नागरिकांना कार्यक्रम तसेच ताज्या बातम्यांपासून वंचित राहावे लागत असल्याचे असोसिएशनने निवेदनात म्हटले आहे.

खासदार जगदीश शेट्टर यांनी मागणी गांभीर्याने घेत ती पुढे पाठवून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. तसेच BSNL बेळगाव कार्यालयात बैठक घेऊन नेटवर्कच्या समस्येवर सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल बेळगाव ऑटोमोबाईल मर्चंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार जगदीश शेट्टर यांचे आभार मानले.

असोसिएशनचे उपाध्यक्ष रविन मोदी, अध्यक्ष शरद पाटील, सचिव कमरुद्दीन सौदागर आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.