belgaum

दरोड्याच्या आरोपातील चौघांना अटकपूर्व जामीन

0
Conviction
 belgaum

बेळगाव लाईव्ह: रात्रीच्या वेळी भररस्त्यात दुचाकी अडवून दोघांना मारहाण करून रोख रक्कम व मोबाईल हिसकावून घेतल्याच्या आरोपाखाली दाखल गुन्ह्यातील चौघांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

गोणगनूर, ता. रामदुर्ग येथील तनवीर साहेबखान पठाण यांनी याप्रकरणी चार जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, १७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १० वाजता रामदुर्गहून रामापूर मार्गे गोणगनूरकडे जात असताना रामापूर गावाच्या हद्दीतील नर्सरी ब्रिजजवळ आरोपींनी त्यांची मोपेड/स्कूटर अडवली.

आरोपींनी फिर्यादीकडील मोबाईल फोन तसेच १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. तसेच फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

 belgaum

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) सह कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात आनंद यल्लापा तळवार, प्रज्वल फकीरप्पा तळवार, बसवराज कल्लाप्पा कोरकोप्पा आणि रमेश तिम्मन्ना तळवार या चौघांना आरोपी करण्यात आले आहे. चौघेही गोणगनूर येथील रहिवासी असून त्यांचा शेती व मजुरीचा व्यवसाय असल्याचे कागदपत्रांत नमूद आहे.

प्रकरणाची सुनावणी येथील दहावे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. न्यायालयाने आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करत काही अटी लादल्या आहेत. त्यामुळे दरोड्याच्या आरोपातील चौघांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. संशयित आरोपींच्या वतीने वकील मारुती कामाणाचे आणि हनुमंत कनवी यांनी काम पाहिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.