belgaum

क्लब गोळीबार प्रकरणात कारचालक अटकेत; तपासाला वेग

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : कॅम्प परिसरातील युनियन जिमखाना रम्मी क्लब येथे रौडीशीटर सुरेश जालगार यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी अधिक वेगाने सुरू केला असून, आरोपींना घटनास्थळी आणणाऱ्या कारचालकाला अटक करण्यात आली आहे.

गोळीबार करणाऱ्या आरोपींना मदत केल्याच्या आरोपाखाली कारचालकाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी बीआयएमएस रुग्णालयात करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, त्याची हिंडलगा केंद्रीय कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी कॅम्प येथील युनियन जिमखाना रम्मी क्लबमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी रौडीशीटर सुरेश जालगार यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, प्रसंगावधान राखत सुरेश जालगार यांनी स्वतःचा बचाव केल्याने ते थोडक्यात बचावले.

 belgaum

प्राथमिक तपासात प्रफुल पाटील आणि सुरेश जालगार यांच्यातील जुन्या वैमनस्यातून हा गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रफुल पाटीलच्या गटाशी संबंधित आरोपींनी हा हल्ला केल्याचा संशय असून, या प्रकरणातील अन्य आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके नियुक्त केली आहेत.

या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, गोळीबाराचा कट, त्यामागील सूत्रधार आणि सहभागी आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.