belgaum

आरपीडी परिसरातील सांडपाण्याच्या समस्येचे भिजत घोंगडे

0
Mahapalika city corporation
 belgaum

बेळगाव लाईव्ह : टिळकवाडीतील आरपीडी कॉर्नर येथे वारंवार उद्भवणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक तथा स्थानिक रहिवासी विनायक गुंजटकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे. रस्ता खोदण्यास तातडीने परवानगी देऊन ड्रेनेजची जुनी पाईपलाईन बदलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

आरपीडी कॉर्नर परिसरातील ड्रेनेज चेंबर वारंवार तुंबत असल्याने सांडपाणी देशमुख रस्त्याच्या दिशेने वाहत आहे. त्यामुळे संपूर्ण चौकात दुर्गंधी पसरून स्थानिक नागरिक, व्यापारी, वाहनचालक, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बसथांब्यावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या भागात अनेक व्यावसायिक आस्थापना, हॉटेल्स आणि शैक्षणिक संस्था असल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली असून याबाबत अनेकदा सोशल मीडियासह वृत्तपत्रांमधूनही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

 belgaum
Vinayak gunjatkar

महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी ड्रेनेज चेंबरची स्वच्छता केली जात असली, तरी काही दिवसांतच पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे गुंजटकर यांनी म्हटले आहे. सध्याची ड्रेनेज पाईपलाईन अरुंद असल्याने मोठ्या क्षमतेची नवीन पाईप टाकणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी रस्ता खोदण्याची परवानगी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळत नसल्याने काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्ता खोदण्यास परवानगी देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी. अन्यथा येत्या आठवड्यात स्थानिक नागरिकांसह आरपीडी चौकात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विनायक गुंजटकर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.