belgaum

कौटुंबिक वादातून दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या;

0
Crime news logo
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील यरगट्टी तालुक्यातील नुग्गानट्टी गावात कौटुंबिक कारणावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान दोन सख्ख्या भावांच्या निर्घृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

मृतांची ओळख लगमप्पा रामण्णावर (वय 32) आणि बसप्पा रामण्णावर (वय 38) अशी झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कारणावरून दोन भाऊ आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. हा वाद काही क्षणांतच उग्र झाला. त्यानंतर सुमारे सहा जणांनी धारदार शस्त्रांनी दोन्ही भावांवर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.

 belgaum

या घटनेमुळे नुग्गानट्टी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या प्रकरणी मुरगोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येमागील नेमके कारण आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास सुरू आहे.

घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बसरगी, मुरगोडचे सीपीआय आय. एम. मठपती आणि पीएसआय एल. बी. माळी यांनी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.